Next
युद्धखोर अमेरिका
BOI
Friday, October 19, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this article:

जगातील सर्वांत बलाढ्य, संपन्न देश असे अमेरिकेचे वर्णन केले जाते. हे खरे असले, तरी त्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे या देशाची वर्चस्ववादी वृत्ती. स्वहितासाठी काहीही, कोणत्याही प्रकारे मिळविण्याच्या अमेरिकेच्या प्रवृतीवर अतुल कहाते यांनी ‘युद्धखोर अमेरिका’मधून प्रकाश टाकला आहे.

मुखवटा नसलेल्या अमेरिकेचे कारनामे वाचले की या देशाच्या आदराच्या भावनेला तडा जातो. अमेरिकेने स्वार्थासाठी अनेक देशांना युद्धात ओढले. त्या कारवायांचे परखड विवेचन यात केले आहे अमॉस कुक हा अमेरिकन हवाई बेटांवर पोचल्यानंतर १८ जानेवारी १७७८ पासून बदललेले हवाई बेटांचे चित्र, अमेरिकी वचर्स्ववादाच्या आव्हानाला पुरून उरलेले क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचे प्रयत्न, पुर्तोरिकोतील सत्ता ताब्यात घेणे, पॅरिस करारामुळे फिलिपिन्सवर स्थापन केलेले साम्राज्य, निकारागुआचे प्रभावशाली साम्राज्य उद्ध्वस्त करणे, या ठिकाणच्या अमेरिकेच्या युद्धखोर नीतीचा आढावा लेखकाने घेतला आहे. होंडूरास, इराण, इराक, व्हिएतनाम, चिली, पनामा, अफगाणिस्तान अशा १६ देशांवरील अमेरिकेचे वर्चस्व यातून दाखविले आहे. शिवाय, ट्रम्प आणि परराष्ट्र संबंध यावरही मत व्यक्त केले आहे.

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : ३३५
किंमत : ३४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search