Next
एस हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, January 17, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:पुणे : एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा २०वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त एक जानेवारी २०१९पासून प्रोस्टेट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांसह लायन्स क्लब इंटरनॅशनलचे द्वितीय उपप्रांतपाल अभय शास्त्री, सिलाईचे संस्थापक दादा गुजर, आरोग्यसेवा मेडिकल अ‍ॅकॅडमीचे विश्‍वस्त अनिल शेवडे, आरोग्य भारतीचे सचिव डॉ. मुकेश कसबेकर आणि एस हॉस्पिटलचे संस्थापक प्रा. डॉ. सुरेश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रासंगी बोलताना संघाचे पुणे महानगर संघचालक वंजारवाडकर म्हणाले, ‘गेली २० वर्षे एस हॉस्पिटल खर्‍या अर्थाने संशोधन करत असून, ही पुण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. पाटणकर शल्यविशारद असले, तरी ते आयुर्वेदिक, नॅचरोपॅथीसारखे पारंपरिक वैद्यकीय शाखेतील इतर विषयही शिकले आहेत. भारतीय ज्ञान परंपरेला त्यांनी आधुनिक तंत्राची जोड दिली असून, हे कार्य कौतुकास्पद आहे. मनाची एकाग्रता असलेल्या लोकांचे आरोग्य चांगले राहते. त्यासाठी ‘ईलनेस टू वेलनेस’ व ‘डिसीप्लिनरी ते मल्टीडिसीप्लिनरी’ हा दृष्टीकोन असणे महत्त्वाचे आहे आणि तेच कार्य एस हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाते.’

आरोग्यसेवा मेडिकल अ‍ॅकॅडमीचे विश्‍वस्त अनिल शेवडे म्हणाले, ‘काळाच्या पुढे जाऊन विचार करणे नेहमीच लाभदायक ठरते, त्याचमुळे आज एस हॉस्पिटल प्रगती करू शकले आहे. येथे फक्त रुग्णांना बरे करणेच नव्हे, तर डॉक्टरांची पुढची पिढी तयार करण्याचे कामदेखील होते.’

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे द्वितीय उपप्रांतपाल शास्त्री म्हणाले, ‘काही संस्था चालविणे अवघड असते. त्यामध्ये हॉस्पिटल हे एक आहे. डॉक्टरांना सतत सतर्क राहावे लागते. यामध्ये त्यांच्या परिवाराचेदेखील तितकेच योगदान असते.’

डॉ. सुरेश पाटणकर यांनी एस हॉस्पिटलमधील नवनवीन उपक्रमांची माहिती दिली व आजवरचा हॉस्पिटलचा प्रवास सांगितला. सायली कारेकर यांनी सूत्रसंचालन केले. एस हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. फँथम बर्नाड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search