Next
गृहिणीची व्यथा मांडणार ‘मोलकरीण बाई’
छोट्या पडद्यावर सुरू होणार नवी मालिका
BOI
Friday, March 01, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : घरकाम करणारी बाई आणि तिची मालकीण यांचे अनोखे नाते उलगडणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेत गृहिणीची रोजची व्यथा मांडण्यात आली आहे. 

घरकाम करणारी बाई ही आजकाल आपल्या कुटुंबाचा एक भाग असते, असे म्हटले तर नवल वाटणार नाही. घरातील सगळेच नोकरी करणारे असले, तर मग सगळ्याच कामांना बाई ही संकल्पनाही आता पूर्ण रुजली आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या जशा आपल्या मुलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणेत आता घरकाम करणारी बाई हीदेखील आपली मुलभूत गरज झाली आहे. असे असले, तरी तिच्या समस्या, तिचे आपल्याशी असलेले नाते यावर आपण कधीच फारसा विचार करत नाही. हाच विचार करायला लावणारी ही मालिका असणार आहे. 

घरची गृहिणी आणि मोलकरीण बाई यांच्यात असलेल्या नात्याची गोष्ट या मालिकेतून रंगवण्यात येणार आहे. संघर्ष आणि व्यथांनी भरलेले आयुष्य जगणाऱ्या काही स्त्रीयांची ही कथा आहे, ज्या वेदनेतही काहीतरी सकारात्मक शोधून आयुष्य सुकर करून घेतात आणि इतरांनाही सकारात्मकतेची कास धरायला लावतात. १८ मार्चपासून स्टार प्रवाह या वाहिनीवर सायंकाळी साडे सहा वाजता ही मालिका दाखवण्यात येणार आहे. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार, सारिका निलाटकर, गायत्री सोहम या अभिनेत्री या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. 

या मालिकेबाबत स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी अधिक माहिती दिली. ‘सर्व महिलांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या मोलकरीण बाईच्या आयुष्यावर आधारित ही मालिका करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने मोलकरणींच्या आयुष्यात डोकावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या आयुष्याची दखल या मालिकेतून घेतली जाईल’, असे ते म्हणाले.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search