Next
‘रिफिलर्स’मध्ये योगा कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, June 29, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this storyपुणे : चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ संस्थेतर्फे रिफिलर्स व्हॅल्यू मार्ट येथे जागतिक योग दिनानिमित्त अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘चैतन्य इन्स्टिट्यूट’तर्फे मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबात आणि समाजात परत आणण्यासाठी हा कार्यक्रम घेतला.

एक तासाच्या कालावधीत सुमारे ४०० लोकांनी रिफिलर्स व्हॅल्यू मार्टच्या प्रांगणात योगा केला. त्यामध्ये स्क्रिझोफेनिया, स्वभाव दोष, व्यक्तिमत्व दोष, वृद्धत्वामुळे येणारे आजार, विशिष्ट गोष्टीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांबरोबरच ‘रिफिलर्स’च्या कर्मचारी आणि ग्राहकांचा समावेश होता. या वेळी ‘रिफिलर्स’चे संचालक अमित गुप्ता आणि ‘चैतन्य इन्स्टिट्यूट’चे संचालक रॉनी जॉर्ज हे उपस्थित होते.

या प्रसंगी रॉनी जॉर्ज म्हणाले, ‘चैतन्य इंन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ संस्था मानसिक ताणामुळे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात असंख्य विकारांनी ग्रस्त असलेल्या पुणे आणि परिसरातील लोकांसाठी काम करत आहे. प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते यावर आमचा विश्वास आहे आणि सर्व प्रकारच्या ताण तणावांपासून दूर होण्याचा काहीतरी मार्ग निश्चित असतो. रिफिलर्स व्हॅल्यू मार्टमध्ये आयोजित केलेला कार्यक्रम आमच्या अनेक उपक्रमांपैकी एक होता. एका नव्या उमेदीने ताजेतवाने झालेले शरीर, मन आणि अंतरात्म्यासह लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करणे यासाठी असे उपक्रम राबविण्यात येतात.’

‘मानसिक आजारांमुळे हे लोक आधीच खचलेले असतात. अशा लोकांना मोकळे होण्यासाठी, त्यांच्यात पुन्हा उत्साह येण्यासाठी आणि जेणेकरून मानसिक आजारांचा त्यांच्यावर अधिक परिणाम होऊ नये यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणे हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश होता. या कार्यक्रमासाठी ‘रिफिलर्स’ने आम्हाला त्यांचे आवार वापरू दिले याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. यामुळे एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या जनसमुदायाला एकत्र येणे शक्य झाले.’

‘रिफिलर्स’चे संचालक अमित गुप्ता म्हणाले, ‘एका समान उद्दिष्टाने इतक्या वेगवेगळ्या वयोगटातले आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून एवढे लोक एकत्र आले हे बघणेच खूप रोमांचक आहे. आपल्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनातून थोडी विश्रांती घेण्यासाठी योगा हे सर्वोत्तम माध्यम आहे. तुमच्यातील नकारात्मकतेपासून सुटका करून घेण्यासाठी आणि पुन्हा नव्या उमेदीने दैनंदिन व्यवहार करण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी कधीकधी अनुभवी व्यावसायिकांची गरज असते हे या वेळी सहभागी सदस्यांना समजून घेण्यास मदत झाली.’

‘रिफिलर्स व्हॅल्यू मार्ट ही लोकांना एकत्र येण्याच्या दृष्टीने आदर्श जागा आहे. आमच्या इथे एकत्र येऊन लोकांना पुन्हा आनंद मिळण्याचे आणखी एक कारण मिळाले ही गोष्ट आमच्या दृष्टीने खूप आनंददायी आहे. भविष्यात अशा प्रकारचे आणखी उपक्रम राबविता येतील अशी आम्ही आशा करतो,’ असे गुप्ता यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link