Next
‘मुलांनी खोट्या यशाच्या मागे लागू नये’
BOI
Tuesday, September 04 | 02:40 PM
15 0 0
Share this story

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे सत्कार करण्यात आलेले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. मागे शिल्पा पटवर्धन, राधिका वैद्य, केतकी जोगळेकर आदी.

रत्नागिरी : ‘मुलांनी लहान वयातच एकाग्रता वाढवली पाहिजे. खोट्या यशाच्या मागे लागू नका. विज्ञान संशोधनात विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध आहेत,’ असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

पाचवी व आठवीत शिष्यवृत्ती मिळविलेल्या ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल चित्पावन ब्राह्मण सहायक मंडळातर्फे करण्यात आला. त्यानंतर त्या बोलत होत्या. या वेळी ४० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येकाला पुस्तकरूपी भेट देण्यात आली.

या वेळी शिल्पाताई म्हणाल्या, ‘जगात कोणतीही गोष्ट फुकट व शॉर्टकटने मिळत नाही. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना विद्यार्थ्यांनी मनात रुजवली पाहिजे. आपण भगवान परशुरामाचे वंशज आहोत. त्यामुळे फक्त ज्ञान नव्हे तर शरीरसंपदाही कमावली पाहिजे. लहान मुले आपले शिक्षक आणि आई-वडिलांचेच ऐकतात व त्यांना आदरस्थानी मानतात. त्यामुळे त्यांनी मुलांना भरपूर वेळ दिला पाहिजे. ध्येयाने कसे चालावे, हे लहान वयातील मुलांना पालकांनीच शिकवले पाहिजे. माझ्या आईने मला ‘कोणतीही गोष्ट येत नाही, असे म्हणायचे नाही,’ असे सांगितले. त्यामुळे मी प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. आपला मेंदू अनेक नोंदी करत असतो. प्रयत्नपूर्वक या नोंदी वाढवल्या पाहिजे. त्यामुळेच मेंदू सजग होतो. बदलत नाही ते ज्ञान व बदलते ते विज्ञान. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास करावा.’

या वेळी मंडळाच्या खजिनदार राधिका वैद्य, सहकार्यवाह अनंत आगाशे, कार्यकारिणी सदस्य केतकी जोगळेकर, शरच्चंद्र लेले, अविनाश काळे, प्रसाददत्त गाडगीळ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
नीला वैद्य About 133 Days ago
छान उपक्रम, शिल्पा ताईचे भाषण सुरेख
0
0

Select Language
Share Link