Next
आता पुण्यात ‘रिझर्व्हराइड’ ही नवी टॅक्सी सेवा
प्रेस रिलीज
Wednesday, November 01 | 06:36 PM
15 0 0
Share this story

‘रिझर्व्हराइड’च्या संचालक श्रीमती सीमा मंगल
पुणे : ‘प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करतानाच चालकांनाही लाभ मिळवून देणारी ‘रिझर्व्हराइड’ ही टॅक्सी सेवा पुण्यात सुरू करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या टॅक्सीसेवा पुरवठादारांपेक्षा अधिक दर्जेदार सेवा या नावीन्यपूर्ण अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेमध्ये बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार असून उत्पन्नाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहे’, अशी माहिती ‘रिझर्व्हराइड’च्या संचालक श्रीमती सीमा मंगल यांनी दिली.
 
त्या म्हणाल्या  ‘ग्राहक व चालक या दोघांच्या गरजा भागविणाऱ्या कॅब सेवा पुरवठादाराची बाजारपेठेची गरज लक्षात घेत आम्ही या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा पूर्णपणे पारदर्शक असेल आणि भारतातील टॅक्सी क्षेत्राला ही सेवा एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. भारतात कारची संख्या मर्यादित असल्यामुळे आणि सर्वाजनिक पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्यामुळे कॅब सेवा पुरवठादारांची गरज प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार २०२०पर्यंत कार/टॅक्सी यांची मागणी १५ टक्के सीएजीआरच्या (वार्षिक सरासरी वृद्धी दर) दराने वाढणार आहे. अलीकडेच सॉफ्ट बँकेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, २०२० पर्यंत अॅपवर आधारित टॅक्सी क्षेत्राची उलाढाल भारतात ७ अब्ज अमेरिकन डॉलर (रु. ४५,००० कोटी) इतकी असणार आहे. ‘रिझर्व्हराइड’मध्ये  २०१८ अखेरपर्यंत १५ शहरांमध्ये आठ हजार  कॅब चालक समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट असून २०२२पर्यंत एक लाख ४१ हजार  चालकांसाह ५१ शहरात ही सेवा सुरू करण्याची योजना आहे. रिझर्व्हराइड सेवेसाठी ८०० चालकांनी सध्या नोंदणी केलेली आहे’.

किहारास ग्रुप एलएलपी या समूहातर्फे संचलित करण्यात येणारी रिझर्व्हराइड ही भारतीय ऑनलाईन परिवहन नेटवर्क कंपनी आहे. १ सप्टेंबर २०१६ रोजी ऑनलाईन कॅब सेवा पुरवठादार म्हणून या कंपनीची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

 या सेवेची वैशिष्ट्ये अशी आहेत : 
सुविधेनुसार आरक्षण करण्याची सुविधा, यात स्थानिक आणि बाहेरगावी जाणाऱ्या आरक्षणांसाठी आगाऊ कॅब आरक्षण (अॅडव्हान्स्ड कॅब बुकिंग) उपलब्ध.
अनुभवावर आधारित 'फेव्हरिट ड्रायव्हर्स' नेमण्याचा पर्याय
स्वच्छता, वर्तणूक आणि वक्तशीरपणा या निकषांवर आधारित चालकांना मिळालेल्या निकषांवर निवड.
अतिरिक्त सुरक्षेसाठी त्रयस्थ संस्थेकडून जीपीएसच्या माध्यमातून प्रवासावर लक्ष ठेवण्याचा पर्याय उपलब्ध.
बाहेरगावच्या प्रवासासाठी आकारले जाणारे शुल्क पूर्वनिश्चित टप्प्यांनुसार न आकारता अंतरानुसार आकारणार
क्यूआर कोडचा वापर करून प्रवास सुरू आणि संपवता येणार असल्यामुळे चालकांकडून गैरवापर होण्यावर निर्बंध
अचानक भाडेवाढ नाही
'चालकांना प्राधान्य' हा दृष्टिकोन असल्यामुळे चालकांना उत्पन्नाचा जास्तीत जास्त हिस्सा मिळवून देण्यावर भर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link