Next
अंजुरफाटा शाळेत शिक्षक दिन साजरा
मिलिंद जाधव
Friday, September 07, 2018 | 05:59 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. या दिवशी आठवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकविले आणि शिक्षकांची भूमिका बजावली. या उपक्रमातून जबाबदारी, परस्पर सहकार्य, गुरूंप्रति कृतज्ञता, आदर, सामाजिक जाणीव या मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना कृतीद्वारे झाली.शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. उपक्रमाचे यशस्वी नियोजन विकास पाटकर यांनी केले होते. मंजिरी विद्वास यांनी शिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या बालशिक्षकांना खाऊ व भेटवस्तू दिल्या. ‘विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते आई-वडिलांप्रमाणे असते. म्हणून विद्यार्थी आपल्या खूप जवळचे असतात,’ असे शिक्षक विजयकुमार जाधव यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Roshani R.Patil About 230 Days ago
विद्यार्थी व शिक्षकवृंद अंजूर फाटा खूप मनापासून अभिनंदन
0
0
विजयकुमार जाधव About 230 Days ago
Very nice
1
0

Select Language
Share Link
 
Search