Next
ब्लॉकचेन डेव्हलपर नॅनोडिग्री अभ्यासक्रमाची सुरुवात
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 12:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अध्ययन आणि नोकरीचा संबंध परस्परांशी जोडून देण्यासाठी वचनबद्ध लाइफलाँग लर्निंग मंच युडॅसिटीने करिअरसाठी सज्ज करणाऱ्या ब्लॉकचेन डेव्हलपर नॅनोडिग्री अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. ब्लॉकचेन क्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांजवळ असलेल्या अनोख्या दृष्टीचा उपयोग करून ब्लॉकचेन डेव्हलपर नॅनोडिग्री प्रोग्रामचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

भारतीयांना उदयोन्मुख तंत्रज्ञानांचे शिक्षण देऊन भविष्यकाळातील नोकऱ्यांसाठी सज्ज करण्यात ‘युडॅसिटी’चे व्यासपीठ कायमच अग्रभागी राहिले आहे आणि त्यावरील नॅनोडिग्री हा अभ्यासक्रमही याला अपवाद नाही. पदवीधरांना या संधींचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या दृष्टीने नोकरीसाठी आवश्यक तसेच बाजारात मागणी असलेली ब्लॉकचेन कौशल्ये आत्मसात करता यावीत यावर ‘युडॅसिटी’चा ब्लॉकचेन डेव्हलपर नॅनोडिग्री भर देणार आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सध्या काम करत असलेल्या ब्लॉकचेन डेव्हलपर्सच्या, तसेच नियुक्ती करणाऱ्या व्यवस्थापकांच्या सहयोगाने उपयोगात आणण्यासाठी योग्य असे प्रकल्प करण्याची संधी मिळेल आणि या क्षेत्रातील आघाडीच्या तज्ज्ञांसोबत त्यांचा थेट संपर्क प्रस्थापित होईल.

‘युडॅसिटी’चे व्यवस्थापकीय संचालक (भारत) इशान गुप्ता म्हणाले, ‘अतिकुशल डेव्हलपर्स तयार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कोणते ते ओळखून पुरवण्याचे काम आम्ही ‘युडॅसिटी’मध्ये करतो. हे अतिकुशल डेव्हलपर्स पुढे बाजारपेठेच्या आवश्यकता व मागण्यांनुसार उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासात योगदान देतात. ब्लॉकचेन कौशल्यांना असलेल्या मागणीत सर्व उद्योगक्षेत्रांमध्ये झालेली प्रचंड वाढ बघता, यावरील अभ्यासक्रम आमच्या नॅनोडिग्री श्रेणीत समाविष्ट करणे साहजिकच होते. ब्लॉकचेन डेव्हलपर किंवा इंजिनीअर म्हणून एक उज्ज्वल करिअर घडवण्यात, एखाद्या उदयोन्मुख स्टार्ट-अपमध्ये नवीन सुरक्षित पेमेंट प्रणालीची रचना करण्यात किंवा फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यात आम्ही तयार केलेला हा अभ्यासक्रम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link