Next
मुंबईतील डबेवाल्यांकडून व्यवस्थापनशास्त्राचे धडे
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, March 30, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:



पुणे : मुंबईकर ग्राहकांचे डबे अचूक आणि वेळेवर पोहोचविणाऱ्या, आयएसओ आणि सिक्स सिग्मा प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांकडून अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसममधील विद्यार्थ्यांना ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’, ‘इफेक्टिव्ह मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये हा कार्यक्रम आज (३० मार्च) आयोजित केला होता. नूतन मुंबई टिफिन सर्व्हिसेस चॅरिटी ट्रस्टचे सचिव किरण गवंडे, बाळासाहेब भालेराव यांनी व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आझम कॅम्पसमधील (पुणे कॅम्प) हाय टेक हॉल येथे हा कार्यक्रम झाला.



‘अल्लाना इन्स्टिट्यूट’चे संचालक डॉ. आर. गणेसन यांनी स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते या डबेवाल्यांचा सत्कार करण्यात आला.

किरण गवंडे यांनी त्यांच्या डब्यांची वितरण व्यवस्था, कोडिंग, इतिहास, नीतीमूल्ये यांची माहिती दिली. दोन लाख मुंबईकरांना दररोज वेळेत, अचूक डबे पोचवले जातात. उन, पाऊस, अतिवृष्टी, गाडयांचा संप अशा अडचणींना तोंड देऊन सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search