Next
सागरी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी चर्चासत्र
BOI
Thursday, August 23 | 04:42 PM
15 0 0
Share this story


पुणे : भारताचे सागरी क्षेत्र हे देशाची सुरक्षा, पर्यावरण आणि विकासाच्या दृष्टीने धोरणात्मकरित्या अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या सागरी क्षेत्राशी निगडित आव्हाने, त्यावरील उपाय आणि विकासाच्या संधी यासंबंधी तज्ज्ञांची मते जाणून घेण्याची संधी जिज्ञासूंना मिळणार आहे. पुण्यातील ‘मेरिटाईम रीसर्च सेंटर’तर्फे शनिवारी, २५ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या साहाय्याने ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

पर्यावरण विभागाच्या सभागृहात येत्या शनिवारी, सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने  https://goo.gl/forms/Ochux0CKuglFEquV2 या संकेतस्थळावर जाऊन अथवा कार्यक्रमस्थळीदेखील नोंदणी करता येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून, ‘नॅशनल शिपिंग बोर्डा’चे अध्यक्ष प्रदीप रावत, ‘डिफेन्स इंटलिजन्स’चे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल व्ही. जी. खंदारे यांची या वेळी भाषणे होणार आहेत. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सोमक रायचौधरी हे देखील आपली मते मांडणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, ‘मेरिटाईम रीसर्च सेंटर’चे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, संस्थेचे सल्लागार प्रफुल्ल तलेरा या वेळी उपस्थित राहणार आहेत. सागरी क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही या चर्चासत्राचा उपयोग होईल.

कार्यक्रमाविषयी 
सागरी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन 
वेळ : शनिवार, २५ ऑगस्ट, सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०.  
स्थळ : पर्यावरण विभागाच्या सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
नावनोंदणी :  https://goo.gl/forms/Ochux0CKuglFEquV2 किंवा कार्यक्रमस्थळी 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link