Next
‘वंचितांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळावा’
अरुण खोरे यांनाशरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. वंचितांसाठी झटणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीही समाजात आहेत. त्यामुळे वंचितांसाठीचे हे कार्य असेच पुढे सुरू ठेवायला हवे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे (मानचिन्ह व १० हजार रुपये रोख), जीवनगौरव पुरस्कार अंकुश काळे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) व युवा साहित्य पुरस्कार सुप्रिया सोळांकूरे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. या घटकांचे भले होण्यातच त्यांना समाधान असते. त्यासाठी कोणी लेखणीतून, तर कोणी साहित्यातून, तर कोणी प्रत्यक्ष काम करून आपल्या भावना रेखांकित करतात.’

खोरे म्हणाले, ‘सर्व चळवळीत एका व्यक्तीवर कायम अन्याय झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी होय. गांधीजींना अस्पृश्य न ठेवता चळवळींशी जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी वैचारिक सांधेजोड झाली पाहिजे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 64 Days ago
This situation is in existence for hundreds of years . It will take more than one generation to do away with it . We have to keep trying .
0
0

Select Language
Share Link
 
Search