Next
मो. ग. रांगणेकर
BOI
Tuesday, April 10, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

पाच अफलातून भूमिकांमधून प्रभाकर पणशीकरांना घडवत आणि मराठी रंगभूमीवर प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर करत ‘तो मी नव्हेच’सारखं रेकॉर्डब्रेकिंग नाटक देणारे दिग्दर्शक आणि नाटककार मोतिराम गजानन रांगणेकर यांचा दहा एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मधे त्यांच्याविषयी...
,,.....
दहा एप्रिल १९०७ रोजी जन्मलेले मोतिराम गजानन रांगणेकर हे नाटककार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. तसंच ते उत्तम चित्रकारसुद्धा होते. वयाच्या तेविशीतच त्यांनी स्वतःचं साप्ताहिक काढण्याचं धाडस दाखवलं होतं. 

तुतारी, वसुंधरा, चित्रा, आशा, अरुण, सत्यकथा, नाट्यभूमी यांसारख्या गाजलेल्या साप्ताहिकांचं, मासिकांचं त्यांनी संपादन केलं होतं. त्यासाठी ते स्वतः लेख लिहीत, मार्केटिंग करत आणि त्यानिमित्त फिरताना झालेल्या काही ओळखींमधून त्यांचा ओढा नाटकाकडे वळला होता. त्यातूनच त्यांनी पुढे ‘नाट्यनिकेतन’ ही  संस्था काढली आणि अनेक नाटकांच्या निर्मितीबरोबरच लेखन-दिग्दर्शनाची धुराही यशस्वीपणे सांभाळली. 

अलंकार, आले देवाजीच्या मना, आशीर्वाद, संगीत एक होता म्हातारा, कुलवधू, नंदनवन, जयजयकार, धाकटी आई, माझे घर, वहिनी, कोणे एके काळी, मोहर, पतित एकदा पतित का सदा?, भटाला दिली ओसरी यांसारख्या अनेक नाटकांचं लेखन त्यांचंच. 

अपूर्व बंगाल, आश्रित, तो मी नव्हेच, देवाघरची माणसं, धन्य ते गायनी कळा, पठ्ठे बापूराव, भूमिकन्या सीता, मीरा-मधुरा, राणीचा बाग, हिरकणी यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 

१९६८ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना १९८२ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. 

एक फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचं निधन झालं. 

(‘पर्फेक्शनिस्ट रांगणेकर’ हा लेख वाचण्यासाठी https://goo.gl/HnCESz येथे क्लिक करा. मो. ग. रांगणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search