Next
बँक ऑफ बडोदाचा ११२वा वर्धापनदिन साजरा
BOI
Tuesday, July 23, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : बँक ऑफ बडोदाच्या ११२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकवर्ग आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुणे कार्यालयात मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.    

विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, त्यात अंदाजे २५० कर्मचारी सहभागी झाले होते;तसेच ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. महाराष्ट्र उच्च शिक्षण व माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयात वृक्षलागवड करण्यात आली. निवारा वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजनसमारंभही आयोजित करण्यात आला होता.

या वेळी बँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनचे प्रमुख के. के. चौधरी म्हणाले, ‘११२ वर्षांच्या वाटचालीतील एक भाग असणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमच्या ग्राहकांबरोबर व कर्मचाऱ्यांबरोबर स्थापनादिन साजरा करणे गौरवाचे आहे. आपण सर्वांनी इतकी वर्षे आमच्यावर दाखवलेला विश्वास अतिशय मोलाचा आहे आणि यापुढेही आम्हाला तुमची साथ हवी आहे. आम्ही यापुढेही सर्वोत्तम सेवा आणि सर्व ग्राहकांना बँकिंगचा उत्कृष्ट अनुभव देणार आहोत.’

(या बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील रोपळे गावात वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search