Next
‘रानडे इन्स्टिट्यूट’तर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
BOI
Friday, February 22, 2019 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागातर्फे (रानडे इन्स्टिट्यूट) माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा तीन मार्च २०१९ रोजी रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेऊन या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले अनेक पत्रकार राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून, माध्यमांशी संलग्न इतर अनेक क्षेत्रांमध्येही या विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना गत काळातील आठवणींना उजाळा देता यावा या हेतूने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाते.

तीन मार्चला आयोजित केलेल्या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रानडे इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

मेळाव्याविषयी :
दिवस :
तीन मार्च २०१९
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचा (रानडे इन्स्टिट्यूट) आवार, डेक्कन जिमखाना, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search