Next
भोंडला आणि दांडियात रंगले दिव्यांग विद्यार्थी
लायन्स क्लबच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Friday, October 11, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पारंपरिक पोशाख घालून मोठ्या उत्साहाने दांडिया खेळणारी, तितक्याच उत्साहाने ‘ऐलमा पैलमा.. , अशी गाणी म्हणत भोंडला खेळणारी दिव्यांग मुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. छान कपडे घालून, नटून-सजून आलेली ही मुले या खेळात अगदी रंगून गेली होती. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट व कोथरूडच्या वतीने आयोजित महाभोंडला व दांडिया कार्यक्रमाचे.


दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील या पारंपरिक सणांचा, खेळांचा  आनंद घेता यावा यासाठी दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते. कामायनी संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कामायनी, सेवासदन दिलासा केंद्र, शुभदा कार्यशाळा, ज. र. तरटे मुक्तशाळा, जीवनज्योत शेल्टर वर्कशॉप या संस्थांमधील २०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. 


उत्कृष्ट वेशभूषा आणि दांडिया सादर करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना बक्षीसेही देण्यात आली. दांडियामध्ये शुभम पानसरे, गौरव वांजळे, अमन आल्हाट, प्रशांत रणदिवे यांनी, तर वेशभूषेसाठी मंथन खिलारे, आदेश पाथरकर, अमन शेख, प्रदीप कुशावह यांनी बक्षीसे मिळवली. विद्यार्थिनींमध्ये दांडियासाठी साक्षी धुमाळ, तनया बर्वे, श्वेता पुजारी, आरती पवार यांनी तर, वेशभूषेसाठी सुप्रिया गायकर, महालक्ष्मी अय्यर, चैत्राली पोटे, रिया गुजर यांनी बक्षीसे मिळवली. 


या वेळी मालती भामरे, अभय शास्त्री, श्रध्दा पेठे, रेश्मा माळवदे, श्रीलेखा कुलकर्णी, रितू नाईक, उपक्रम प्रमुख सीमा दाबके व अनुराधा शास्त्री, तसेच कामायनीचे संस्थेचे कालिदास सुपाते व सुजाता अंबे उपस्थित होते. पल्लवी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search