Next
नो अॅपचे पुण्यात अनावरण
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 02:12 PM
15 0 0
Share this story


पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ‘प्रोग्राम फॉर प्रायमरी प्रिवेंशन ऑफ सेक्शुअल व्हायोलन्स’ (PPPSV-पीपीपीएसव्ही) कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘नो(NO)’ या अॅपचे उद्घाटन १२ फेब्रुवारी २०१८ रोजी केले. या अॅपचा उद्देश भारतातील स्त्रिया व मुलांवरील लैंगिक हिंसा रोखणे हा आहे. केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुणे, शारीते येथील बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी आणि भारतातील तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

याप्रसंगी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या, ‘लैंगिक हिंसा ही आपल्या जगातील एक कठोर वस्तुस्थिती आहे. लैंगिक हिंसेमुळे निरनिराळे मानसिक आणि मनोकायिक आजार उद्भवतात. सर्व समाजाला ग्रासून टाकणारी ही एक सार्वजनिक आरोग्यसमस्या आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील लैंगिक हिंसा टाळण्यासाठी समाजाचाच धाक उपयोगात आणण्यासाठी निर्माण केले गेलेले हे अॅप आहे. ‘NO’ अॅप सारखे महत्त्वाचे उपक्रम हा लैंगिक हिंसेचा प्रश्न सोडवण्यासाठी, अनेक संस्था आणि व्यक्तींचा सहभाग घडवून आणत आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे.’

डॉ. क्लाउस बैअर हे शारीते, बर्लिन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलॉजी अँड सेक्शुअल मेडिसिन’ येथे संचालक प्राध्यापक आहेत. त्यांनी पीपीपीएसव्ही कार्यक्रमाची उद्दिष्टे विशद केली. ते म्हणाले, ‘लैंगिक हिंसा घडूच नये, तिला प्राथमिक प्रतिबंध करता यावा म्हणून भारतात वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित मार्गाने काही पद्धतींचा विकास करणे, हे पीपीपीएसव्हीचे ध्येय आहे. या कार्यक्रमाचा गाभ्याचा भाग म्हणजे स्त्रिया आणि मुलांना कुठल्याही धक्कादायक अतिप्रसंगाला तोंड द्यावेच लागू नये, अशा अतिप्रसंगांपासून त्यांचे परिणामकारक संरक्षण करता यावे, यासाठी नाविन्यपूर्ण असे मार्ग आणि उपाय शोधणे हा आहे.’ 

'NO' अॅप हे अतिप्रसंगाच्या घटनांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधून, नोंदवून ते प्रसृत करण्याच्या प्रक्रियेवर आणि पद्धतींवर आधारित आहे. सध्याच्या मोबाईल तंत्रज्ञानामुळे हे सगळे सोपे झाले आहे. विनयभंगाचा धोका किंवा प्रत्यक्ष अतिप्रसंगाच्या घटनेमध्ये 'NO' अॅप वापरणाऱ्यांना ‘संकट आले आहे’, किंवा ‘धोका वाटतोय’, असा संदेश मोबाईलवरच्या एका आयकॉन किंवा बटणाला स्पर्श करून, क्षणार्धात पाठवता येतो. अशा इतर 'NO' अॅप धारण करणाऱ्या जवळपासच्या परिसरातील मोबाईलधारकांना हा संदेश तत्क्षणी मिळेल, शिवाय अशा घटनेचे ठिकाणही कुठे आहे ते समजेल. या कार्यपद्धतीमुळे समाजाचा वचक वाढून, अशा घटनांवर नियंत्रण येईल. 

‘प्रतिसाद’ या अॅपच्या माध्यमातून ‘NO’ अॅप हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर सहकार्य करीत आहे. अशा रीतीने प्रत्येक संकटाचा इशारा देणारा संदेश घटनेच्या ठावठिकाण्यासाहित पोलिसांना तत्क्षणीच मिळेल. यामुळे पोलिसांना गस्तीवरच्या अधिकाऱ्यांना नेमक्या ठिकाणी लगेचच पाठवणे शक्य होईल. याशिवाय, एक अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर संकटाचा इशारा देणारे कॉल तत्पर कार्यक्षमतेने हाताळत असेल.

रिचर्ड व्हान डेर मेर्वे, हे दक्षिण आशियातील बायर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘NO अॅप हे लैंगिक हिंसेला समाजाने दिलेले उत्तर आहे. यामुळे सार्वजनिक दृष्टीकोणात गुणात्मक फरक पडणार आहे. समस्येला उत्तर शोधताना समाजाचा सक्रिय सहभाग मिळवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. स्त्रियांच्या मनातील सुरक्षिततेची भावना वाढवण्याची आकांक्षा ठेवणाऱ्यांना बळ देणे आणि शक्यतेच्या कोटीतल्या गुन्हेगारांना निःशस्त्र करणे, अशा दोन्ही गोष्टी यातून साध्य होतील. NO अॅप निव्वळ मोबाईल अप्लिकेशन न राहता, ते लैंगिक छळाचा सामना करण्यासाठी, यूजर्सना एकमेकांना आधार देणारे माध्यम ठरेल.’

प्रसिद्ध अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे पीपीपीएसव्हीच्या सल्लागार मंडळाचे एक सन्माननीय सभासद आहेत. त्यांच्यासह अभिनेता शशांक केतकर यांनी उद्घाटन समारंभात भाग घेतला. याशिवाय, अमेय वाघ आणि सुबोध भावे यांनीसुद्धा NO अॅपला पुरस्कृत करणारे व्हिडिओ संदेश पाठवले.

संपर्कासाठी: 
कन्सल्टंट थेरपिस्ट - पीपीपीएसव्ही
प्रकल्प संकेतस्थळ - www.pppsv.org
स्वतःच चाचणी करून उपचार घेण्याचे साधन - www.troubled-desire.com

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link