Next
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांना अभिवादन
प्रेस रिलीज
Tuesday, August 08, 2017 | 04:06 PM
15 0 0
Share this article:

कराड : सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस उत्तरा भोसले व डॉ. अतुल भोसले.कराड (सातारा) : कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यासाठी कृष्णा रुग्णालयाच्या प्रांगणात मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

‘सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवत आहेत. कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रुग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. याचबरोबरच हजारो कुटुंबांना रोजगार प्राप्त झाला असून, याचे श्रेय केवळ आप्पांनाच जाते. अशा या दूरदृष्टीच्या नेत्याची उणीव सर्वांना नेहमीच भासत राहील,’ अशा भावना या वेळी बोलताना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. बी. डी. पाटील, डॉ. दौलतराव आहेर, इंजिनीअरिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. अशोक गुजर, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जयवंतराव जगताप, विक्रम मोहिते, कृष्णा कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील, माणिकराव पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव जाधव, संचालक दीपक जाधव, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक हणमंतराव पवार, बाळासाहेब यादव, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, माजी नगरसेवक महादेव पवार, शब्बीर शेख, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे, सुरेश खिलारे, कान्हा लाखे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, श्रीमती शुभांगी पाटील, माजी जि. प. सदस्य डॉ. राजकुमार पवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, हर्षवर्धन मोहिते, चंद्रहास जाधव, प्रमोद पाटील, प्रदीप थोरात, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप चव्हाण, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग देसाई, सर्जेराव निकम, कृष्णतराव जगताप, सर्जेराव निकम, अजितराव थोरात, एल. आर. पाटील, अशोकराव पाटील, जयवंतराव पाटील, सर्जेराव पाटील, संपतराव थोरात, महिपती पाटील, विनायक धर्मे, व्ही. के. मोहिते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब लाड, नारायण शिंगाडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, विराज मोहिते, आदित्य मोहिते, कापिलचे सरपंच शशिकांत जाधव, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, जखीणवाडीचे सरपंच नरेंद्र पाटील, नारायणवाडीचे सरपंच राजेंद्र देशमुख, नांदलापूरचे सरपंच माणिकराव शिर्के, गोटेचे सरपंच ताहीर आगा, कासारशिरंबेचे सरपंच संतोष पाटील, रेठरे बुद्रुकचे उपसरंपच हणमंतराव धर्मे, नारायण शिंगाडे, आनंदराव जमाले, वसंतराव घोडके, अशोकराव पवार, संपतराव माने, विजयभाऊ जगताप, विश्वापसराव जगताप, पैलवान धनाजी पाटील, पैलवान बबनराव दमामे, मारूती निकम, जयवंतराव सावंत, बाळासाहेब पवार, काशीनाथ गरूड, गणेश गरूड, मोहन निकम, मोहन कचरे, मुकुंद चरेगावकर, पैलवान गुलाबराव पाटील, विकास पाटील, प्रसाद पाटील, जयवंतराव साळुंखे, उमेश शिंदे, अधिकराव निकम, शेखर ढवळे, गजेंद्र पाटील, गणेश पाटील, सुनील कणसे, हरीभाऊ पाटील, सिद्धेश्वशर पाटील, प्रमोद पाटील, किरण मुळे, कुबेर माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरही जयवंतराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, शेती अधिकारी एन. जे. कदम, ए. बी. खटके, आर. के. चन्ने, एस. एच. भुसनर, एस. एस. भिंताडे, जे. पी. यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search