Next
फुलपाखरू उद्यानाबाबत रत्नागिरीत नऊ जूनला कार्यक्रम
BOI
Thursday, June 06, 2019 | 11:29 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि ठाणे येथील शहरी जैवविविधता ग्रुप यांच्या वतीने पर्यावरण जागृतीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा आहे. हा कार्यक्रम नऊ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता मारुती मंदिर येथील हॉटेल कार्निवल येथे होईल. यात ‘आसमंत’च्या वनस्पती उद्यान आणि तेथे लवकरच सुरू होणार्‍या फुलपाखरू उद्यानाविषयी माहिती दिली जाणार आहे. 

‘आसमंत’ने एमआयडीसी येथील जागेमध्ये वनस्पती उद्यान सुरू केले आहे. येथे देशी झाडांच्या प्रजातींची लागवड केली आहे. हळूहळू हा प्रकल्प आकार घेत असून, ठाणे शहरी जैवविविधता ग्रुपच्या सहकार्याने लवकरच या ठिकाणी फुलपाखरू उद्यान सुरू होणार आहे. या कार्यक्रमात उद्योजक नंदकुमार पटवर्धन ‘आसमंत’च्या कार्याबाबत माहिती देणार आहेत.

जैवविविधता ग्रुपतर्फे फुलपाखरांसंदर्भात वैविध्यपूर्ण माहितीचे सादरीकरण केले जाणार आहे. फुलपाखरांच्या जगभरात साडेसतरा ते वीस हजार प्रजाती आहेत. त्यातील सुमारे एक हजार ५०० भारतात आढळतात. रत्नागिरीतही अनेक प्रकारची फुलपाखरे आहेत. फुलपाखराच्या जीवनचक्राच्या चार अवस्था आहेत. त्यातून फुलपाखराचा जन्म ही निसर्गातील विलोभनीय घटना आहे. परागकण वाहून नेण्यास फुलपाखरांची मदत होते. फुलपाखरू संवर्धनासाठी आवश्यक झाडे कोणती, रंगीबेरंगी व मनाला आनंद देणारी ही फुलपाखरे लांबून प्रवास करून कशी येतात आदी स्वरूपाची माहिती दिली जाईल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आसमंत’तर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : रविवार, नऊ जून २०१९ 
वेळ : सकाळी १० वाजता 
स्थळ : हॉटेल कार्निवल, मारुती मंदिर, रत्नागिरी.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 19 Days ago
Very risky --- economically . They are very delicate creatures . Beautiful ? Of course they are .very susceptible to temperatures and humidity . Well , best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search