Next
पुण्यात सोलापूर सार्थक सोहळ्याचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 03:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : संपूर्ण देशभरात सोलापूर शहर हे चादरीसाठी ओळखले जाते. वस्त्रोद्योगासोबतच आज सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून देखील पुढे येत आहे. आयटी, बांधकाम व्यवसाय, अॅग्रो टुरिझम, शिक्षण, खाद्य पदार्थ असा वेगवेगळ्या क्षेत्रात शहराने चांगली प्रगती केली आहे. सोलापूरची ओळख सांगणाऱ्या या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहता येण्यासाठी दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत ‘सोलापूर सार्थक सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापुरच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रमही या तीन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार भगवान रामपुरे व चित्रतार राम खरटमल यांची प्रकट मुलाखत व सादरीकरण,  हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ, राजशेखर पंचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सदाबहार नृत्याविष्कार देखील यावेळी अनुभवायला मिळणार आहे.  या सोबत पुणे जिल्ह्यात नेत्रदीपक कार्य करत असलेल्या सोलापुरकरांचा गौरव सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हास्ते तीन फेब्रुवारीला केला जाणार आहे.

मूळचे सोलापुरचे मात्र सध्या शिक्षण, व्यवसाय आणि नौकरीनिमित्त पुण्यात असणाऱ्या तरुणांनी २००६मध्ये एकत्र येत सोलापूर मित्रमंडळाची स्थापना केली. मंडळातर्फे २००६ मध्ये प्रथम पुण्यातील सोलापुरकरांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आजच्या घडीला जवळपास सहा लाख सोलापुरकर पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे यंदा आयोजित करण्यात आलेला  सार्थक सोहळा म्हणजे एकप्रकारे जन्मभूमी आणि कर्मभूमीचा स्नेह मिलाप ठरणार आहे.

सोलापूर सार्थक सोहळ्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून तसेच रोहन देशमुख अध्यक्ष लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी यांनी सहकार्य केल्याची माहिती सोहळ्याचे आयोजक लक्ष्मीकांत गुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रदीप नागणे उपस्थित होते.

सोलापूर सार्थक सोहळ्यामध्ये खास सोलापुरी खाद्यपदार्थ असणारे कडक भाकरी चटणी, शेतकऱ्यांच्या शेतातून थेट चवदार हुरडा, स्पेशल साउजी चिकन तसेच इतर शाकाहारी-मांसाहारी पदार्थ याचबरोबर अनेक नामांकित शिक्षण संस्था, बांधकाम व्यवसायिक, वस्त्रोद्योग उत्पादक, चादरी-टॉवेलचे प्रदर्शनदेखील असल्याची माहिती गुंड यांनी दिली.

सोहळ्याविषयी :
दिवस : दोन ते चार फेब्रुवारी २०१८
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link