Next
‘सुला’च्या वाईन मेकिंग टीममध्ये बदल
प्रेस रिलीज
Friday, October 06 | 06:21 PM
15 0 0
Share this story


नाशिक : ‘सुला विनयार्ड्स’सोबत १७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर अजय शॉ यांनी ‘सुलाविनयार्ड्स’ सोबतचा आपला प्रवास इथेच थांबवण्याचे ठरवले आहे आणि आपली जबाबदारी त्यांनी हुशार व तरुण नव्या वाईनमेकिंग टीमच्या हाती सुपूर्द केली आहे. यापुढे करण वसानी महाराष्ट्रातील आणि गोरख गायकवाड हे कर्नाटकातील वायनरिजच्या वाईन मेकिंग प्रक्रियेचा कार्यभार सांभाळतील.डिरेक्टर ऑफ वाईन मेकिंगचा पदभार स्वीकारलेले केरी डॅमस्की हे देखील अजून काही काळ भारतातील व्यवसायात लक्ष घालतील.

सुला विनयार्ड्सचे संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, ‘सुलाच्या सुरुवातीपासून ते आजवरच्या यशस्वी प्रवासामध्ये अजय शॉ यांची कामगिरी महत्त्वाची राहिलेली आहे आणि अर्थातच, त्यांना आम्हाला सोडून जाताना पाहून आम्हाला दु:ख होत आहे. त्यांना पुढे जीवनात जे काही ध्येय साध्य करायचे ठरवले आहे त्यात ते यशस्वी होवोत अशा आमच्या सदिच्छा आहेत आणि मला खात्री आहे की ते नक्कीच यशस्वी होतील.’ 

ते पुढे म्हणाले, ‘करण आणि गोरख ह्या दोन मेहनती तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून मिळालेल्या पदोन्नतीसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. ते दोघेही केरीसोबत काम करत असल्याने आगामी भविष्यात सुलाची वाईन मेकिंग टीम अधिक सक्षम होणार हे निश्चितच आहे. केरी येथे आमच्या सोबत खूप उत्तम वेळ व्यतीत करत आहे आणि त्याची अवाक करणारी अनुभव संपन्नता बघता, आमच्या वाईन मेकिंगला विशेषत: आमच्या प्रीमियम वाईन्सला जबरदस्त उत्तेजन मिळणार आहे.’


सुला विनयार्ड्सबद्दल : 
सुला विनियार्डही वाईनक्षेत्रातील भारताची पहिली पसंत आहे. त्यांच्या पुरस्कारप्राप्त वाईन्स देशभरातील सर्वोत्तम हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या वाईन्स ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यातदेखील केल्या जातात.  येत्या २०१८ मध्ये सुला १० लाख वाईनकेस विक्री करण्याच्या मार्गावर आहे. 

भारताच्या वाईनटुरिझममध्येदेखील सुला अग्रगण्य आहे. त्यांनी २००५ मध्ये देशातील पहिली वाईनरी टेस्टिंगरूम सुरु केली, त्यानंतर२००७मध्ये बियॉंडबाय सुला नावाचे पहिले विनयार्ड रिसॉर्ट सुरु केले आणि नुकतेच २०१७मध्ये भारतातील पहिले हेरीटेज वाईनरी रिसॉर्ट द सोर्स अॅट सुला सुरु केले. गेल्या वर्षभरात तबब्ल २,५०,००० पर्यटकांनी भेट दिलेली सुलाही आता जगातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या वाईनरीजपैकी एक म्हणून ओळखली जाते. भारतातील तर ती क्रमांक एकची वाईनरी आहेच, जेथे प्रत्येक वाईन चाहता हमखास टेस्टिंगसाठी येतो.सुला विनियार्डसने ‘बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू वाईन अॅण्ड स्पिरीट्स टुरिझम’साठी वाईनक्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजाला जाणारा २०१६ सालचा ड्रिंक्स बिझनेस अॅवॉर्ड जिंकले आहे. हे अॅवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय कंपनी आहे.
मुख्यत: भारतीय वाईन्सवर लक्ष केंद्रित करून, सुला नवनवीन प्रकारच्या वाईन्सवर प्रयोग करून पाहत आहे. यासोबतच शाश्वत शेतीला पाठबळ देण्याचा आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्नदेखील करत आहे. ‘सुला’ हे जगातील सर्वात शाश्वत वाईन निर्माते म्हणून नावारूपाला येण्याच्या मार्गावर आहे.त्याव्यतिरिक्त सुला सिलेक्शनसह, रेमी, कॉइनट्रेयु, हार्डीज, कोनोसूर, लेग्रँडनॉईर आणि एसाही सारख्या प्रतिष्ठीत ब्रँडच्या पोर्टफ़ोलिओसह कंपनी वाईन आणि स्पिरीट्स इम्पोर्टरमध्येही अग्रेसर आहे

 अधिक माहितीसाठी : www.sulavineyards.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link