Next
‘एल अँड टी लीडरशीप डेव्हलपमेंट अॅकॅडमी’ला गोल्ड रेटिंग
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लार्सन अँड टुब्रोच्या लोणावळा येथील लीडरशीप डेव्हलपमेंट अॅकॅडमीला (एलडीए) इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशन अंतर्गत प्रतिष्ठित गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आले आहे.

‘आयजीबीसी’ ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशनद्वारे राष्ट्रीय प्राधान्यक्रम म्हणजेच नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, ऊर्जा आणि पाणी कार्यक्षमतेची मागणी, अक्षय ऊर्जेचा वापर, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कचऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य आणि आराम व जैववैविध्य आदींवर काम करण्यासाठी आवश्यक हरित संकल्पना आणि तंत्राच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन दिले जाते.

‘एल अँड टी’ कॉर्पोरेट एचआर, वरिष्ठ उपाध्यक्ष योगी श्रीराम, म्हणाले, ‘एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने ‘एल अँड टी’ आपल्या काही शाश्वत उपक्रमांसह भारतीय कॉर्पोरेट विश्वात आदर्श पायंडा घालून देत आहे. एल अँड टी लीडरशीप डेव्हलपमेंट अॅकॅडमीचा कॅम्पस भारतातील अभिनव कॉर्पोरेट विद्यापीठ म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यासाठी सार्थ असलेले ‘आयजीबीसी’चे गोल्ड रेटिंग मिळाले आहे. हरित कॅम्पससाठी ‘आयजीबीसी’ गोल्ड रेटिंग मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.’

‘आयजीबीसी’ने ‘एलडीए’चे २४ एकरांच्या लँडस्केप कॅम्पसचे आठ निकषांवर मूल्यांकन केले. प्रत्यक्ष ठिकाणचे नियोजन आणि व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, जल संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता, साहित्य आणि स्त्रोत व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वास्थ्य, हरित शिक्षण, संशोधन व विकास यांचा त्यात समावेश होता. कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमीत कमी राहावे म्हणून ‘एलडीए’ने विशिष्ट धोरण, पद्धती व प्रक्रिया अवलंबल्या आहेत. सौर पॅनेल्स, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार्स, तज्ज्ञ बागकामशास्त्रज्ञांद्वारे देखरेख केली जाणारी लँडस्केप सुविधा, हरित- औषधी वनस्पती आणि फुलझाडे यांचा ‘एलडीए’च्या हरित उपक्रमांत समावेश होतो.
 
पुण्याजवळील लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या ‘एलडीए’मध्ये भविष्यातील नेतृत्व आणि जागतिक कॉर्पोरेट उद्योजक तयार करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १९९७मध्ये स्थापना झाल्यापासून ‘एलडीए’ने ‘एलअँडटी’, तसेच काही निवडक कॉर्पोरेट्सच्या व्यवसायांना मदत केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search