Next
प्रसूतीनंतर मातांसाठी औषधी वनस्पती उपचार उपयुक्त
प्रेस रिलीज
Friday, June 29, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘प्रसूतीनंतर आपल्या तान्ह्या बाळाची काळजी घेण्यासोबतच आईने स्वतःची काळजी घेणे देखील तितकेचे महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर स्त्रीचे शरीर कमकुवत व अशक्त झालेले असते. मातेच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराचे संरक्षण करण्यासाठी आयुर्वेदात काही औषधी वनस्पती व तेलांचा वापर सुचवण्यात आला आहे. यामुळे तणाव दूर होण्यासही मदत होते’, असे द हिमालया ड्रग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रतिभा एस. बाबशेट यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, ‘गर्भारपणात हार्मोन्समध्ये होत असलेल्या बदलांमुळे त्वचा अधिक संवेदनशील होऊन जाते. ज्यामुळे कदाचित त्वचेविषयक आजार होऊ शकतात. त्यामुळे मातांनी आपण वापरत असलेल्या उत्पादनाबाबत अधिक दक्ष राहिले पाहिजे. या उत्पादनांचा बाळावर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच योग्य स्किन केअर उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे. शक्यतो नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनांचा वापर करावा. नैसर्गिक घटकांमुळे त्वचा कोमल बनते आणि गरोदरपणाशी संबंधित त्वचा समस्यांपासून संरक्षण मिळते. कंट्री मेलो (बाला), फाइव्ह लिव्हड चॅश्त ट्री, अश्वंगंधा,  मंजिष्ठ, कोरफड अशा औषधी वनस्पतींचा वापर करावा. या औषधी वनस्पती मातेच्या शरीरावर उपचार करतात. शरीराचे संरक्षण करण्यामध्ये मदत करतात, ज्यामुळे मातृत्वाचा प्रवास अत्यंत आनंददायी व आरामदायी होतो. खोबरेल तेल, बदाम तेल व तीळाचे तेल कोरड्या त्वचेला कोमल बनवण्यामध्ये मदत करतात. कोरडेपणा व खाजेपासून आराम मिळण्यासाठी बॉडी बटरचा वापर करता येऊ शकतो. सुवासिक मसाज तेलाने हलका मसाज केल्याने वेदना कमी होण्यामध्ये मदत होते आणि अधिक आराम मिळतो.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link