Next
‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्यांचे यश
प्रेस रिलीज
Friday, October 12 | 04:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी लखनऊ येथे झालेल्या चौथ्या ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’मध्ये यश मिळविले आहे. सिद्धांत कुमार मिश्र आणि राम मिश्र (बीटेक इलेक्ट्रॉनिक्स) या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना प्रथम, तर कपिल आगरवाल आणि आदित्य मनेठिया (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना तिसरे पारितोषिक मिळाले.

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग, सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजी आणि पृथ्वी विज्ञान विभाग (इंदिरा गांधी फाउंडेशन, लखनऊ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा चौथा सायन्स फेस्टिव्हल नुकताच पार पडला. विजना भारतीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर, भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेवर ही प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली होती. ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख डॉ. ए. ए. शिंदे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. मीना चव्हाण, डॉ. के. बी. सुतार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

‘वायरलेस पेशंट हेल्थ मॉनिटरिंग अ‍ॅंड अक्सिडेंटल क्रायसीस मॅनेजमेंट सिस्टीम’ या विषयावर सिद्धांत कुमार मिश्र, राम मिश्र यांनी फेस्टिव्हलमधील ‘स्वच्छ भारत’विषयी विचारावर आधारित मॉडेल स्पर्धेत प्रकल्प सादर केले. कपिल अगरवाल आणि आदित्य मनेठिया यांनी ‘नव भारत निर्माण’विषयी विचारावर आधारित ‘टीन सायबरस्पेस’ विषयावरील प्रकल्प सादर केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link