Next
बिग बाज़ारमध्ये आता दररोज स्वस्ताईचा दिवस
प्रेस रिलीज
Thursday, April 05, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this story

बिगबाजार मधील 'हर दिन लोएस्ट' योजनेची माहिती देताना कोथरूड येथील स्टोअरचे  मॅनेजर कृष्णा प्रसाद आणि पुणे विभागाचे मार्केट मॅनेजर सुमित रंजन.
पुणे  :  ‘बिग बाज़ारने त्यांच्या दिड हजारहून अधिक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरात सहा ते ३६ टक्के कपात केली आहे. विशेष म्हणजे या स्वस्त दराचा लाभ ग्राहकांना वर्षभर दररोज  घेता येणार आहे. बिग बाज़ारच्या नव्याने सुरू झालेल्या ‘हर दिन लोएस्ट प्राईज’ या योजनेचे हे कायमस्वरुपी वैशिष्ट्य असणार आहे,’ अशी माहिती बिग बाजारच्या पुणे विभागाचे मार्केट मॅनेजर सुमित रंजन यांनी दिली. 
 
‘दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजे तूप, साखर, खाद्य तेल, डिटर्जंट पावडर, टॉयलेट क्लीनर, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नुडल्स, हेल्थ ड्रिंक, चहा, कॉफी, बिस्कीट, सॉस अशी अनेक उत्पादने एकशे चाळीसहून अधिक शहरांमध्ये असलेल्या बिग बाज़ारच्या सर्व दालनांमध्ये कमी दरांमध्ये उपलब्ध असतील. या नवीन किंमतींमुळे ग्राहकांच्या खिशात बचत जमा राहील. आता नियमित वापरायच्या वस्तू स्वस्त आणि अधिक किफायतशीर होणार आहेत.’ असेही रंजन यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले, ‘या उपक्रमाचा लाभ सहा कोटींहून अधिक घरांना होणार आहे. बिग बाज़ारच्यावतीने सर्व वर्गातील दीड हजारपेक्षा जास्त नियमित वापराच्या उत्पादनांवर सहा ते ३६ टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय ग्राहकांच्या खिशात दोन हजार  कोटींची अतिरिक्त बचत जमा होईल. ‘हर दिन लोएस्ट प्राईज’ वचन हे कायम सुरू राहणार असून ते बिग बाज़ारच्या प्रत्येक ग्राहक वर्गाच्या पसंतीचे रिटेल डेस्टीनेशन धोरण निर्मितीला बळकट करणार आहे.  या उपक्रमामुळे आम्हाला ग्राहकांना ‘कमी’ दरात ‘अधिक’ देण्यास मदत मिळेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे आणखी नवीन ग्राहकांची पावले आमच्या दुकानामध्ये वळतील. शिवाय सध्याचे ग्राहक अधिक प्रमाणात आमच्या दुकानात भेट देतील.’  
 
‘बिग बाज़ारची देशभर २८० स्टोअर्स वेगाने कार्यरत आहेत. याशिवाय मागील काही वर्षांपासून इजीडे, हायपरसिटी, हेरीटेज फ्रेश, निलगीरीज आणि इतर चेन्सना बिग बाज़ारने स्वत:च्या छत्राखाली सामावून घेतले आहे. या व्यापारात सामावून घेण्याच्या आणि विस्तारीकरणाच्या प्रक्रियेमुळे रिटेलरनी कमी किंमतीत नियमित वापराच्या वस्तूंची विस्तृत श्रेणी समाविष्ट करून अर्थकारणाला चालना मिळवून दिली आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्टोअर मॅनेजर कृष्णा प्रसाद उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link