Next
‘सिंहगड’च्या २१ महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this storyपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिंहगड व्यवस्थापनामधील २१ महाविद्यालयांचा पदवीग्रहण समारंभ ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सिंहगड वडगाव संकुलातील सिंहगड कल्चरल सेंटरमध्ये आयोजित केला होता.  सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २१ महाविद्यालयांमधील सहा हजार ४२८ स्नातकांनी पदवी ग्रहण केली.

यामध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, वाणिज्य, विधी, विज्ञान, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन व हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘सिंहगड’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर व इंडियन ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडियाचे संचालक संजय निबंधे  उपस्थित होते. स्नातकासाठी काळा, प्राचार्य व संचालकांसाठी निळा व प्रमुख पाहुण्यांसाठी मखमली लाल असा विशेष पोशाख होता.

सुरुवातीला सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमधून निघालेली मिरवणूक सभास्थानी पोहोचल्यानंतर सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. एम. एन. नवले यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

या वेळी संजय निबंधे यांनी यश हे सोप्या पद्धतीने मिळत नसल्याचे नमूद करून त्यासाठी त्यांना योग्य दिशेने मेहनत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. विद्यासागर यांनी वैज्ञानिक व अभियंता यामधील फरक समजावून सांगितला. ते म्हणाले, ‘‘सिंहगड’मधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात, तसेच अनेक विद्यार्थी घडवण्यामध्ये ‘सिंहगड’चा मोलाचा वाटा आहे, हे आता सिद्ध झाले आहे. वैदिक काळामध्ये आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता होती. आजच्या युगामध्ये स्त्रियांनी अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटला आहे. अंतराळवीर महिला सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ही याची प्रातिनिधिक यांची उदाहरणे आहेत. या २१व्या शतकातही स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये यशाची उंची गाठू शकतील.’

प्रा. नवले यांनी ‘सिंहगड’चे नाव मोठे करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरीव वाटा असल्याचे सांगितले. तसेच भविष्यामध्ये शिक्षण संस्था म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांची नाते कायमस्वरूपी ठेवायचे असल्याचे नमूद करत कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयांतील शिक्षकांची संवाद साधण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. किशोर गुजर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.D.C.Prakshale About 4 Days ago
Very nice सभी छात्रों का अभिनंदन।
0
0

Select Language
Share Link