Next
श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदक्षिणा पालखी सोहळा उत्साहात
BOI
Monday, June 04, 2018 | 01:16 PM
15 0 0
Share this article:

संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदशिणा सोहळ्यातील वारकऱ्यांचे टिपलेले छायाचित्र.

सोलापूर : आळंदी व सासवडच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी एकत्र येऊन श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याची परंपरा यावर्षी अधिक मासाच्या पर्वकाळात सुरू केली. या सोहळ्याची सांगता नुकतीच उत्साहात करण्यात आली.

श्रीक्षेत्र पंढरपूर व पंचक्रोशीतील अनेक तीर्थाची नोंद पुराणामध्ये आहे. त्यामुळे या तीर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्याच्या सानिध्यात काही काळ घालवता यावा म्हणून अधिक मासाच्या पर्वकाळावर श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदशिणा सोहळ्याची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी ही पंरपरा नव्याने सुरू झाली असली, तरी या अगोदर धोंडोपंत दादांनी एकदा श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदशिणा सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे आळंदी येथील बापूसाहेब ढफळ यांनी सांगितले. दादांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे खंडीत झाली. त्यानंतर, मात्र यंदा प्रथमच अधिक मासाच्या पर्वकाळावर ही आगळी वेगळी परंपरा सुरू करण्यात आली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे दीडशे वारकरी एकत्र आले होते. २७ मे रोजी या प्रदक्षिणा सोहळ्याचे प्रस्थान श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून झाले.

त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी, तावशी, सोनके, पिराची कुरोली, पांढरेवाडी, नारायण चिंचोली, अनंवली, खर्डी, धोंडेवाडी, भोसे, तुंगत, चळे, रांझणी, पळशी, पटवर्धन कुरोली, रोपळे बुद्रुक या गावातील तीर्थांचे दर्शन घेऊन पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन जून रोजी या सोहळ्याची सांगता झाली. प्रदक्षिणा कालावधीमध्ये नित्याने श्रींची महापूजा, भजन व कीर्तनाचा गजर गावोगावी होत होता.

या वेळी आळंदी येथील वारकरी बारूसाहेब ढफळ म्हणाले, ‘आम्ही आळंदी व सासवड येथे अशा पद्धतीचा पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा केला आहे; मात्र श्रीक्षेत्र पंढरपूर पंचक्रोशी प्रदशिणा सोहळ्याचे महत्त्व फारच वेगळे आहे. इथली ही परंपरा कायम चालू राहण्यासाठी या सोहळ्यात स्थानिकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याची आवश्यकता आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search