Next
‘इकोझेन’ ठरले स्मॉल बिझनेस ग्रांट काँटेस्टचे विजेते
प्रेस रिलीज
Tuesday, September 04 | 03:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : फेडेक्स कॉर्प.ची उपकंपनी असलेली आणि जगातील सर्वात मोठी जलद वाहतूक (एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन) करणारी कंपनी असलेल्या फेडेक्स एक्स्प्रेसतर्फे इकोझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ऊर्जेवर भर देणाऱ्या पुण्यातील कंपनीची फेडेक्स इंडिया स्मॉल बिझनेस ग्रांट काँटेस्ट २०१८ या स्पर्धेचे विजेते म्हणून घोषणा करण्यात आली.               

थायरोकेअर टेक्नॉलॉजिज लिमिटेडचे अध्यक्ष अरोकियास्वामी वेलुमणी, फेअरसेंट डॉट कॉमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजत गांधी, वीरिडिअन अॅसेट अॅडव्हायजर्स प्रा. लि.चे गुंतवणूक प्रमुख सतीश कटारिया आणि फेडेक्स एक्स्प्रेस इंडियाच्या ग्राउंड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष फिलिप चेंग व फेडेक्स एक्स्प्रेस इंडियाच्या विक्री विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुवेंदू चौधरी या दोन फेडेक्स प्रतिनिधींचा समावेश असलेल्या पॅनलने स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केली.

२०१७ साली या स्पर्धेचे भारतातील पहिले पर्व आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या लघु उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विविध क्षेत्रांतून दुपटीहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यांच्यापैकी बहुतेक कंपन्या सामाजिक जीवन सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची निर्मिती करण्यावर भर देत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link