Next
‘एक टप्पा आउट’च्या मंचावर अशोक सराफ यांची हजेरी
प्रेस रिलीज
Tuesday, July 30, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘एक टप्पा आउट’ या कॉमेडी शोच्या मंचावर या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ हजेरी लावणार आहेत. हा विशेष भाग दोन ऑगस्टला रात्री आठ वाजता दाखवला जाणार आहे. 

अशोक सराफ यांच्या उपस्थितीने सेटवरचे वातावरण बदलले असून, त्यांच्या स्वागतासाठी स्पर्धकांनी जय्यत तयारी केली होती. अशोक सराफ यांच्या सुपरहिट सिनेमातले काही प्रसंग अनोख्या ढंगात सादर करत स्पर्धकांनी ‘एक टप्पा आउट’च्या सेटवर धमाल उडवून दिली. या वेळी स्पर्धकांची थक्क करणारी गुणवत्ता पाहून अशोक सराफही खुश झाले आणि त्यांनी स्पर्धकांना खास टिप्स देत प्रोत्साहन दिले.


‘एक टप्पा आउट’ची ही स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची होत असून, उत्तम सादरीकरणासोबतच स्पर्धेतून बाहेर पडण्याची (एलिमिनेशन) टांगती तलवार असल्यामुळे स्पर्धकांपुढे नवे आव्हान आहे. यासाठी स्पर्धक मेहनत करत आहेत. महाराष्ट्राला अनेक दिग्गज विनोदवीरांचा वारसा लाभला आहे. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यांसारख्या दिग्गज कलावंतांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला हसवले. हीच परंपरा अखंड जपण्याचा प्रयत्न ‘एक टप्पा आउट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. या कार्यक्रमातून बऱ्याच वर्षांनंतर स्टॅंडअप कॉमेडीचा आनंद प्रेक्षकांना घेता येत आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या ऑडिशन्समधून हे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील ही गुणवत्ता एका मंचावर आल्यामुळे प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आउट’ म्हणजे अनोखी पर्वणी ठरत आहेय. ‘एक टप्पा आउट’च्या मंचावर रेशमचे ‘रापचिक राडेबाज’, अभिजीतचा ‘अवली आखाडा’, विजयचे ‘वात्रट वल्ली’ आणि आरतीचा ‘अतरंगी अड्डा’ धमाल करायला सज्ज आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search