Next
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
BOI
Saturday, February 02, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘पद्मगंधा’ प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘यक्षगान : कला आणि अभ्यास’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (तीन फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

‘यक्षगान’ हा कर्नाटकातील महत्त्वाचा लोककला प्रकार आहे. डॉ. शिवराम कारंत यांनी या लोककलेला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण भारतीय रंगभूमीच्या संदर्भात यक्षगान कलेचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. 

‘यक्षगान : कला आणि अभ्यास’ हे यक्षगान विषयावरील मराठीतील पहिलेच पुस्तक पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने ‘यक्षगान केंद्र उडूपी (कर्नाटक)’चे प्रमुख आचार्य गुरू संजीव सुवर्णा आणि त्यांचे शिष्यगण हे सादर करणार आहेत. 

लोकरंगभूमीवरील एक कलात्मक आविष्कार म्हणून ‘यक्षगान’कडे पाहिले जाते. गेली २५ वर्षे विजयकुमार फातर्पेकर हे ‘यक्षगान’चा अभ्यास करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच वेळी अभ्यासपूर्ण पुस्तकाचे  प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी-गायक चंद्रकांत काळे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रत्यक्ष रंगभूमीवर गुरू संजीव सुवर्णा यांच्या प्रयोगातून यक्षगानची झलक अनुभवता येणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search