Next
शंतनू मोघेच्या हस्ते ‘कलाविश्व’ची सांगता
BOI
Friday, January 25, 2019 | 04:58 PM
15 0 0
Share this article:

अभिनेता शंतनू मोघेपुणे : २३ ते २७ जानेवारीदरम्यान येथील ‘राजा रवी वर्मा कलादालना’त आयोजित ‘कलाविश्व २०१९’ या राज्यस्तरीय कला महोत्सवाचे उद्घाटन जल्लोषात झाले. २७ जानेवारीला या महोत्सवाची सांगता होणार असून या वेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणजेच अभिनेता शंतनू मोघे याची विशेष उपस्थिती असणार आहे. 


या महोत्सवात शनिवारी (२६ जानेवारी) कवी संमेलन होणार असून हे संमेलन सर्वांसाठी खूले असेल. रविवारी (२७ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय कला महोत्सवाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी मालिके’तील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे याच्या हस्ते महोत्सवाची सांगता होईल. या वेळी ज्येष्ठ कलाकार प्रमोद कांबळे यांचे कलात्मक प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे प्रज्ञेश मोळक हे शंतनू मोघे याची मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित सर्वांना शंतनूशी मनमुराद संवाद साधता येणार आहे. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक व ‘चित्रलीला निकेतन कला विद्यालय’चे संस्थापक उमेश गुप्ते हे उपस्थित राहणार आहेत. 

कलाविश्व २०१९ या कला महोत्सवाची यंदाची थीम ‘लाल रंग’ असून या थीमवर आधारित अनेक कलाकृती या महोत्सवातील प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. रविवार, २७ जानेवारीपर्यंत कला महोत्सवातील हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत घोले रस्त्यावरील ‘राजा रवी वर्मा कलादालना’मध्ये सर्वांसाठी खुले आहे. कला, कलेचे महत्त्व व कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नेहमीच शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व चित्रलिला निकेतन कला महाविद्यालय हे करत आलेले आहेत. याचीच प्रचीती या महोत्सवातून येत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search