Next
विष्णू मोरेश्वर महाजनी, पांडुरंग महादेव बापट, रावसाहेब राणोजी कसबे
BOI
Sunday, November 12 | 04:00 AM
15 0 0
Share this story

ब्राउनिंग, लाँगफेलो, वर्ड्स्वर्थ, शेली, कोलरिज आणि शेक्सपियर यांसारख्यांच्या अनेक कलाकृती मराठीत आणणारे विष्णू महाजनी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी असणारे सेनापती बापट आणि दलित साहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक रावसाहेब कसबे यांचा १२ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
....................
विष्णू मोरेश्वर महाजनी

१२ नोव्हेंबर १८५१ रोजी पुण्यामध्ये जन्मलेले विष्णू महाजनी हे भारताच्या ब्रिटिश कालखंडातले एमए झालेले कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘विविधज्ञानविस्तार’मधून त्यांनी विपुल लेखन केलं होतं. त्यांना रावबहादूर अशी उपाधी मिळाली होती.

ब्राउनिंग, लाँगफेलो, वर्ड्स्वर्थ, शेली, कोलरिज यांसारख्या अनेक इंग्लिश कवींच्या प्रसिद्ध रचना त्यांनी ‘कुसुमांजली’ या संग्रहाच्या रूपाने मराठीत आणल्या होत्या.

शेक्सपिअरच्या नाट्यकृतींच्या आधारे त्यांनी लिहिलेली मोहविलसित,  वल्लभानुनय, तारा अशी नाटकं गाजली होती. १९०७ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१६ फेब्रुवारी १९२३ रोजी त्यांचं निधन झालं. 

..................

पांडुरंग महादेव बापट

१२ नोव्हेंबर १८८० रोजी पारनेरमध्ये जन्मलेले पांडुरंग बापट हे सेनापती बापट या उपाधीने प्रसिद्ध असणारे प्रमुख सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवक! 

१९२१ ते १९२४मधल्या तीन वर्षांच्या काळात पुण्यामधल्या मुळशी पट्ट्यातल्या धरणग्रस्त गावकऱ्यांसाठी त्यांनी शेकडो सत्याग्रहींचं नेतृत्व करून लढा दिला. त्यामुळे ‘सेनापती बापट’ ही उपाधी त्यांना मिळाली होती. 
कॉलेजकाळात त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली होती. नंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बॉम्बची तंत्रविद्या हस्तगत केली होती. 

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावरसुद्धा त्यांनी भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामधे पुढाकार घेतला होता. भारतीय संस्कृतीचा पाया, दिव्यजीवन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२८ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचं निधन झालं.

.....................

रावसाहेब राणोजी कसबे

१२ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्मलेले रावसाहेब राणोजी कसबे हे समीक्षक, विचारवंत आणि दलित साहित्याचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ते अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 

झोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकर वाद : तत्त्व आणि व्यवहार, मानव आणि धर्मचिंतन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(रावसाहेब कसबे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link