Next
चित्रकलेच्या माध्यमातून मतदार जागृती
BOI
Monday, April 22, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:


पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील ‘साई चित्रकला महाविद्यालया’तर्फे ‘अभिव्यक्ती लोकशाहीची’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत पदपथांवर चित्रकलेच्या माध्यमातून मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली.  

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेसमोर असलेल्या पदपथावर विदयार्थ्यांनी रंग आणि कॅनव्हासच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानासंदर्भात जागृती करून सशक्त लोकशाहीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रकार आणि अभ्यासक मल्लिकार्जून सिंदगी, साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय ठुबे यांची प्रमुख उपस्थित होती. 

लोकशाही प्रक्रियेतील मतदान हा सर्वांत मोठा उत्सव असून या उत्सवाकडे चित्रकार कसे पाहतात, त्यांच्या मनातील लोकशाहीचे प्रतिबिंब कसे आहे याचे मुक्त रेखाटन, मुक्त चित्रण कॅनव्हासवर रंग आणि ब्रशच्या साहाय्याने रेखाटण्यात आले. हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

(उपक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 169 Days ago
Every activity helps , deserves to be encouraged , copied .b
0
0

Select Language
Share Link
 
Search