Next
मोनाली जनबंधू ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 04:40 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना मोनाली जनबंधू. या वेळी दिवा पेजेंटचे  अंजना मास्कारेन्हास, कार्ल मास्कारेन्हास उपस्थित होते.

पुणे : विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत मुंबईच्या मोनाली जनबंधू ‘दिवा मिसेस वेस्ट इंडिया’ व ‘मिसेस फिटनेस इंडिया’च्या विजेत्या ठरल्या आहेत. गायिका शिबानी कश्यप यांच्या हस्ते मोनाली यांना मुकुट प्रदान करण्यात आला. ‘दिवा पेजेंट’तर्फे पुण्यामध्ये नुकतीच ही स्पर्धा झाली. 

‘लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी प्रत्येक स्त्रीला पार पाडावी लागते. या स्पर्धेसाठी मला माझ्या कुटुंबाकडून मोठा पाठींबा मिळाला. आरोग्यदायी, सकस आहार, व्यायाम याबाबत जागरूक असल्याने मला फिटनेसवर जास्त काम करायची गरज भासली नाही. स्पर्धेत भाग घेण्यासाठी घरातूनच नव्हे, तर मित्रपरिवार, नातेवाईक यांचाही पाठिंबा लाभला. या स्पर्धेने माझा आत्मविश्वास अजून वाढला आहे’, असे मोनाली जनबंधू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी दिवा पेजेंटच्या अंजना मास्कारेन्हास, कार्ल मास्कारेन्हास आदी उपस्थित होते. 

 मोनाली जनबंधू यांना चार वर्षांचा लहान मुलगा असून, त्यांनी डी.वाय.पाटील मुंबई विद्यापीठातून इलेट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून एमबीए-एचआर ही पदवी मिळवली आहे. याबरोबरच गायन, नृत्य व स्वयंपाक करणे यात विशेष रुची आहे. त्यांनी शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले असून, त्या उत्तम बेली डान्सरही आहेत.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link