Next
घरकामगार महिलांसाठी आरोग्य शिबीर
साम्राज्य सोसायटीतील महिलामंडळाचा उपक्रम
BOI
Saturday, March 16, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कोथरूडमधील बळवंतपुरम् साम्राज्य सोसायटीमध्ये घरकामगार बायकांसाठी (मोलकरीण) आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सोसायटीतील ज्येष्ठ महिलांचे ‘स्नेहसखी मंडळ’ आणि सेवा आरोग्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. 


यात सोसायटीतील घरांमध्ये काम करणाऱ्या बायकांचे वजन, रक्तदाब, रक्त तपासणी आदी वैद्यकीय तपासण्या करून, त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. हाडांच्या दुखण्याबाबत उपचारासह आवश्यक व्यायाम प्रकारही शिकवण्यात आले. सुमारे १५० बायकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 


या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सोसायटीतील महिलांनी  अर्थसाहाय्य केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सेवा आरोग्य फाउंडेशनचे प्रदीप कुंटे, संजीव बेंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक अष्टपुत्रे यांच्यासह स्नेहसखी मंडळाच्या अध्यक्ष मनोरमा परांडेकर आणि महिला सदस्यांनी प्रयत्न केले. 

आर्थिक अडचण, भीती, वेळेची कमतरता, दुर्लक्ष करण्याची वृत्ती अशा अनेक बाबींमुळे स्वतःच्या आरोग्याबाबत उदासीन असणाऱ्या या महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरमालकिणी आणि अन्य महिला वर्गाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल खूप कौतुक वाटत होते. त्यांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.  

अशाप्रकारे एक आगळावेगळा उपक्रम राबवून या सोसायटीने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search