Next
घोलप महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
प्रेस रिलीज
Thursday, February 28, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:



पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मराठी संस्कृती आपल्यापर्यंत पोचविणाऱ्या म्हणींचे संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्याच्या उद्देशाने चालविल्या जात असलेल्या ‘स्पंदन’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषाविषयक कविता सादर केल्या. कुसुमाग्रजांचा जीवनपट आपल्या मनोगतातून उलगडविला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झावरे यांनी मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतील शिक्षण हे आपल्या संपूर्ण कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. ज्ञानाचे आकलन हे मातृभाषेतूनच परिपूर्ण होते.’



आपल्या रशिया दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या मराठी मातृभाषेचा वापर केलेला पाहून रशियातील जनतेलाही आनंद वाटला. कारण रशिया हा देश मातृभाषेवर प्रेम करणारा आहे. असा आपल्या परदेशदौऱ्यातील मातृभाषेच्या वापराबाबतचा अनुभव कथन केला. आज जागतिक स्तरावर इंग्रजीचे प्राबल्य वाढले असले, तरी ती एक ज्ञानभाषा म्हणून वापरली जात आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी हे अधिकाधिक मराठी माध्यमाचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी आपले प्रत्येकाचे कर्तृत्त्व महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आपणासर्वांचे योगदान गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून त्यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील भूमिका मांडताना मातृभाषेचे कार्य आणि महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी डॉ. नंदा राशिनकर, प्रा. विद्या पाठारे, प्रा. प्रकाश पांगारे, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. विक्रम मालतुमकर, प्रा. सावित्री जाधव, प्रा. भास्कर घोडके, प्रा. अमोल बागड, प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख प्रा. वसंत गावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश चौधरी यांनी केले. प्रा. सुवर्णा खोडदे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search