Next
‘गोडॅडी’च्या समिटमध्ये भारतीय ग्राहकांच्या सहभागात वाढ
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गोडॅडी इन्क. (NYSE: GDDY) या जगातील लघु आणि स्वतंत्र उद्यमांसाठी कार्यरत असलेल्या सर्वांत मोठ्या क्लाउड प्लॅटफॉर्मने आपल्या पहिल्या प्रादेशिक कस्टमर समिटचे मुंबईत आयोजन केले होते. या कार्यक्रमात १८०पेक्षा अधिक ग्राहकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यात वेब व्यावसायिक आणि रिसेलर्सचा समावेश होता.

कंपनीच्या सातत्यपूर्ण ग्राहककेंद्री दृष्टिकोनाचा भाग म्हणून या समिटने पश्चिम भारतातील ग्राहकांसाठी कल्पनांची देवाणघेवाण करून भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी एकत्र येण्याची संधी म्हणून काम केले. या समिटमध्ये विविध वक्त्यांची भाषण सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात ‘गोडॅडी’चे मुख्य उत्पादन अधिकारी स्टीवन अल्डरिच यांचा समावेश होता. त्यांनी ‘स्वतंत्र उद्यम जागतिक रोजगाराला कशा रितीने चालना देतात’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यापाठोपाठ ग्राहकांसोबत संवादात्मक सत्रही घेतले.

या सत्राचे नेतृत्व ‘गोडॅडी’ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष निखिल अरोरा यांनी केले. आपल्या ग्राहकांच्या समस्यांचा तुम्ही व्यवसायाला कशा रितीने चालना देऊ शकता या विषयावर चर्चा केली. या कार्यक्रमात चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली होती आणि नॅसकॉमचे माजी अध्यक्ष आणि भारतीय आयटी उद्योगाला चालना देणारे व्यक्तिमत्व किरण कर्णिक यांच्या समारोपाच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘गोडॅडी’साठी ग्राहक सहभाग आणि मान्यता हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. या कस्टमर समिटमधून ‘गोडॅडी’ने यापूर्वी घोषित केलेल्या ग्राहक सहभाग कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जाते.

‘गोडॅडी’च्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनाबाबत बोलताना ‘गोडॅडी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अरोरा म्हणाले, ‘आमच्या भारतातील ग्राहकांना सहकार्य करणे आणि त्यांना आपल्या व्यवसायासाठी ऑनलाइन अस्तित्व निर्माण करून त्याचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने उपलब्ध राहाणे हे आमच्या मूल्यवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या ग्राहकांकडून कृतज्ञता आणि वचनबद्धतेच्या गोष्टी ऐकताना आम्हाला आनंद होतो. ग्राहकांचा हा प्रवास भारतातील आमच्या १० लाख ग्राहक पायाला सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या उद्यमांसोबत जोडले जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. अशा प्रकारच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम व्यासपीठ तयार करण्यासाठी उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link