Next
सोलापुरात घंटागाडी करणार मतदारांमध्ये जनजागृती
BOI
Saturday, March 16, 2019 | 11:48 AM
15 0 0
Share this article:सोलापूर : जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत सुमारे साडेचारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘स्वीप’ उपक्रम राबवला जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती केली आहे. डॉ. भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत १५ मार्च २०१९ रोजी झालेल्या बैठकीत स्वीप कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा मतदारसंघांत यापूर्वी सुमारे ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. मतदानाची ही टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शपथ नाट्य, पत्रलेखन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
 
सोलापूर महानगरपालिकेबरोबरच जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती केली जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीस ‘स्वीप’ समितीसह अध्यक्ष अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, देवदत्त गिरी, महापालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, शिक्षणाधिकारी संजय राठोड, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGRamopadhye About 104 Days ago
Any activity which makes people aware of their opportunity to express their opinion of the government , is laudable . They should seize that opportunity .
0
0

Select Language
Share Link
 
Search