Next
‘एमआयटी’तर्फे ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे महाविद्यालयीन शिक्षकांसाठी देशातील पहिल्याच ‘टीचर्स लीग’ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २४ ते २९ एप्रिल २०१९ या कालावधीत आयोजित केली असून, या स्पर्धेसाठी सर्व महाविद्यालयांतील जास्तीत जास्त शिक्षकांनी २० एप्रिलपूर्वी आपले नाव नोंदवायचे आहे,’ अशी माहिती ‘एमआयटी डब्लूपीयू’चे प्रोहोस्ट प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २४ एप्रिलला सायंकाळी चार वाजता ‘एमआयटी’च्या क्रीडांगणावर होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता होईल. या स्पर्धेत क्रिकेट (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष), थ्रोबॉल (महिला), बॅडमिंटन (पुरुष व महिला) व टेबल टेनिस (पुरुष व महिला) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम अशी एकूण तीन लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे व प्रशस्तीपत्रके दिली जातील. सर्वसाधारण विजेत्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येक क्रीडा प्रकारांतील विजेता व उपविजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहे.

‘शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम शिकविण्यात व्यस्त असल्यामुळे क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुतांशी शिक्षकांची इच्छा आणि व क्रीडा नैपुण्य असूनही त्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही, हे लक्षात घेऊन ‘एमआयटी’तर्फे देशात प्रथमच पुणे जिल्हास्तरावरील आंतरमहाविद्यालयीन शिक्षक क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, भारती विद्यापीठ, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, सीओईपी, बीएमसीसी, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, डी. वाय. पाटील विद्यापीठ, पीईएस मॉडर्न कॉलेज, एस, पी. कॉलेज आणि एआयएसएसएमएस सीओई अशा व अन्य महाविद्यालयांनी या क्रीडा स्पर्धेला पाठींबा दर्शविला आहे,’ असे चिटणीस यांनी सांगितले.
 
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्वशांती हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा प्रमुख हेतू आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांनी स्वत:च्या शारीरिक क्षमतेकडेही लक्ष द्यावे, शिक्षकांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी ही संयोजकांची अपेक्षा आहे. विविध क्रीडाप्रकारांमधील निष्णात शिक्षक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली आहे.

या पत्रकार परिषदेत ‘एमआयटी डब्लूपीयु’चे प्रोहोस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे आणि ‘एमआयटी डब्लूपीयु’चे क्रीडा संचालक डॉ. पी. जी. धनवे हे उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी : प्रा. सचिन शिंदे- ९४०४२ ३२७८१, डॉ. ज्ञानेश्वर माने- ९८९८६ ९९५९३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search