Next
भारतीय खासदारांचा शिकागो विद्यापीठ दौरा
प्रेस रिलीज
Friday, October 27 | 04:20 PM
15 0 0
Share this story

वंदना चव्हाणपुणे : पर्यावरणविषयक बदलांच्या अभ्यासासाठी आयोजित अमेरिकेतील शिकागो विद्यापीठ येथील ‘क्लायमेट पार्लमेंट’ अभ्यास दौऱ्यामध्ये संसद सदस्य म्हणून खासदार वंदना चव्हाण यांचा भारतीय शिष्टमंडळात समावेश झाला आहे.

३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीमध्ये संसदेतील सदस्य आणि सहकारी यांच्या शिष्टमंडळासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकागो विद्यापीठातील तज्ज्ञांबरोबर उर्जा आणि पर्यावरणविषयक विविध प्रकारच्या समस्या विषयक चर्चासत्रांचा समावेश या परिषदेत आहे.

खासदार वंदना चव्हाण यांच्यासमवेत लोकसभा सदस्य विन्सेंट पाला, राज्यसभेचे खासदार डॉ. संजय जैसवाल, लोकसभा सदस्य कालीकेश सिंग देव, राकेश सिंग, रिती पाठक, प्रभास कुमार सिंग, राज्यसभा विवेक गुप्त यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेच्या माध्यमातून शिकागो आणि वॉशिंग्टन (डीसी) या दोन्ही क्षेत्रातील संशोधक आणि सरकारी नेत्यांसोबत ‘संशोधन आणि धोरणविषयक भागीदारी’ या विषयावर संवाद साधण्याची आणि त्याबद्दल सल्ला देण्याची एक महत्त्वपूर्ण संधीदेखील उपलब्ध होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link