Next
आशिष नेहरा रिटायर होतोय...
BOI
Wednesday, November 01 | 07:45 PM
15 0 0
Share this story

आशिष नेहरा

वारंवार जखमी झाल्यामुळे अनेकदा टीममधून बाहेर राहावं लागणारा, पण पुन्हा निवडला जाणारा, बॉलिंगमध्ये महत्त्वाची पार्टनरशिप करणारा, कधी कधी शेवटी बॅटिंगला उतरून सामना जिंकून देणारा आणि कोणी कधी झेल सोडला तर कचकचीत शिव्याही हासडणारा... असा आशिष नेहरा हा भारताचा वेगवान गोलंदाज आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होतो आहे. त्या निमित्ताने त्याच्याबद्दल...
.........
सचिन तेंडुलकरबद्दल बोललं जायचं, की त्याला स्वतःलाही माहिती नाही, त्याच्या शरीराला खेळामुळे झालेल्या किती जखमा आहेत. तशाच असंख्य जखमा शरीरावर बाळगणारा एक क्रिकेटर क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्त होतोय. तो म्हणजे आशिष नेहरा.

अठरा वर्षं वा त्याहून जास्त खेळणाऱ्या अगदी मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे. दक्षिण आफ्रिकेतील २००३च्या गाजलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने अँडी कॅडिकच्या शॉर्ट बॉलवर अद्वितीय, डोळ्यांचे पारणे फेडणारा सिक्सर स्टेडियमबाहेर हाणला खरा; पण त्यानंतर तो लवकर आउट झाल्यावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर फारसं मोठं लक्ष्य ठेवलं नाही.

भारत हा अत्यंत महत्त्वाचा सामना हरणार अशीच शक्यता सर्वांना वाटत होती. शिवाय भारताचा ‘बॉलिंग अॅटॅक’ फारसा पक्का नव्हता. निवृत्ती घेऊनही कॅप्टन सौरव गांगुलीच्या विनंतीखातर वर्ल्डकप खेळणारा अस्सल शाकाहारी, कर्नाटकी म्हातारा वाघ जवागल श्रीनाथ सोडल्यास झहीर खान आणि आशिष नेहरा हे दोन तरुण प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे भारताची गोलंदाजीची बाजू कमकुवत होती. शिवाय राहुल द्रविड हा कामचलाऊ विकेट कीपर होता.

तो सामना दक्षिण आफ्रिकेत ‘डे-नाइट’ खेळला गेल्याने भारताचा डाव संपेपर्यंत भारतात रात्र झाली होती. भारत हा महत्त्वाचा सामना हरणार, याच विचारात बहुतेक जण झोपी गेले होते. भारताकडून प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारा डावखुरा बॉलर होता आशिष नेहरा. त्याच्याकडून कोणालाही जास्त अपेक्षा नव्हत्याच; पण त्याने दणका दाखवला. सुरवातीलाच विकेट्स घेत इंग्लंडची परिस्थिती अत्यंत बिकट केली. भारताने तो सामना अगदी सहज जिंकला. आशिष नेहरा सहा विकेट्स घेऊन सामनावीर झाला होता.

विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी आणि आशिष नेहराक्रिकेटमध्ये पार्टनरशिप नेहमीच महत्त्वाची असते; पण पार्टनरशिप ही बहुतेक वेळा फलंदाजीसंबंधित बघितली जाते; पण गोलंदाजीतही पार्टनरशिप अत्यंत महत्वाची असते. एक गोलंदाज एका बाजूने अचूक गोलंदाजी करून धावा रोखून फलंदाजावरील ताण वाढवतो. आणि दुसरा गोलंदाज त्याचा फायदा घेऊन विकेट घेतो; पण यात एक बॉलर नेहमी ‘अनसंग’ राहतो, म्हणजे उजेडात येत नाही. आशिष नेहराने जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, आणि बराच काळ झहीर खानसोबत, पुढे मुनाफ पटेल, प्रवीण कुमार, मग भुवनेश्वर कुमार आणि आता जसप्रीत बुमराहसोबतही बॉलिंग पार्टनरशिप केली. यात त्याने सुरुवातीला अननुभवी, नंतर प्रमुख आणि आता अनुभवी बॉलर म्हणून बॉलिंग केली, करतो आहे; पण तरीही तो म्हणावा तसा खूप  यशस्वी होऊ शकला नाही. त्याचं सतत जखमी होणं आणि टीमच्या आत-बाहेर होत राहणं, या गोष्टी त्याला कारणीभूत होत्या. तरीही आशिष नेहरा हा भारताचा महत्त्वाचा बॉलर म्हणून कायम ओळखला जाईल.

आशिष नेहराला बॉलिंगसाठीच नाही, तर त्याच्या काही छोट्या पण महत्त्वपूर्ण बॅटिंग खेळीसाठीही ओळखलं जातं. २००३मध्ये वर्ल्ड कपपूर्वी भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली होती. तो अत्यंत कठीण असा दौरा ठरला. कडक थंडी, बोचरे वारे, त्यात न्यूझीलंडमधील बॉल प्रचंड स्विंग आणि सीम होणारी परिस्थिती. एका एकदिवसीय सामन्यात भारतापुढे अवघं २०० धावांचं लक्ष्य होतं. सेहवागनं शतक ठोकून विजयश्री अगदी गळ्यापर्यंत आणलेली होती; पण भारताचा डाव गडगडला. सेहवाग, युवराजसिंग, कैफ, संजय बांगर, झहीर खान लागोपाठ आउट होत गेले आणि भारताची शेवटची विकेट उरली. जिंकायला तीन बॉल्समध्ये दोन धावा आवश्यक होत्या. किवी ब्लॅक कॅप्स पूर्णपणे फॉर्ममध्ये. तेव्हा अकराव्या क्रमांकावर आशिष नेहरा शेवटचा खेळाडू म्हणून उतरला. श्रीनाथने जागेवरच मारलेल्या बॉलवर डेंजर एंडकडे नेहराने धावत एक कठीण रन घेतला. आणि पुढच्या बॉलवर चौकार हाणला. नेहराच्या त्या शॉटमुळे भारत जिंकला.

२००२मध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला असता लॉर्डस् मैदानावर अजित आगरकरने शतक ठोकण्याचा विक्रम केला. तेव्हा त्या शतकात आशिष नेहराचाही मोलाचा वाटा होता. भारताच्या नऊ विकेट्स गेल्या होत्या. अकराव्या क्रमांकावर आलेल्या आशिष नेहराने सुरक्षित खेळत अजित आगरकरला ‘लॉर्डस्’वरील मानाचं शतक पूर्ण करू दिलं. आणि त्यानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफच्या बॉलिंगवर स्टेडियमबाहेर सिक्सर हाणला.

नेहरामध्ये दिल्लीचे सर्व गुण आहेत. तोंडात सतत शिव्या असतात, हे स्क्रीनवरही दिसून आलंय. महेंद्रसिंह धोनी कीपर आणि राहुल द्रविड स्लिपमध्ये असताना सोपी कॅच सोडली गेली, म्हणून दोघांनाही उद्देशून दिलेली शिवी टीव्हीवरही ऐकू आली होती. ‘आयपीएल’मध्ये दिली डेअरडेविल्सकडून बॉलिंग करताना कीपर दिनेश कार्तिकने कॅच सोडल्यावर नेहराने शिवी हासडली होती. या शिव्या साध्या-सरळ नव्हत्याच.

आशिष नेहराला आता सर्व जण ‘नेहराजी’ असे संबोधतात. तो एक रोल मॉडेल आहे. वयाच्या या टप्प्यावरही तो अत्यंत मेहनत करून फिट आहे. आजही तो १४० किलोमीटर वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता राखतो.

डावखुऱ्या नेहराची बॉलिंग अॅक्शन बॉलिंगचा बादशहा वसीम अक्रमप्रमाणे साधी सरळ नव्हती, की डावखुऱ्या झहीर खानसारखी दिलखेचक नव्हती. त्याची शैली काहीशी सदोष होतीच. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत राहिला. परिणामी सतत जखमी होऊन तो टीममधून आत-बाहेर होत राहिला.

एके काळी बाल विराट कोहलीला स्वहस्ते पारितोषिक देणारा आशिष नेहरा आज विराट कोहलीच्या ‘कॅप्टन्सी’मध्ये खेळतोय. हे फक्त त्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळेच. आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर आशिष नेहरा निवृत्त होतो आहे. भारताच्या या जिगरबाज खेळाडूला मानाचा मुजरा!

- अभिजित पानसे, मुक्त पत्रकार
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

बॅटिंग करिअर

प्रकार

मॅचेस

इनिंग्ज

नॉट आउट

रन्स

मोठी खेळी

अॅव्हरेज

खेळलेले बॉल्स

स्ट्राइक रेट

चौकार

षट्कार

कसोटी

१७

२५

११

७७

२९

.

२५६

३०.०८

एकदिवसीय

१२०

४६

२१

१४१

२४

.६४

२४६

५७.३२

१२

टी - २०

२६

२८

२२

.

३९

७१.७९

आयपीएल

८८

२२

१५

४१

२२

.८६

६२

६६.१३

बॉलिंग करिअर

प्रकार

मॅचेस

इनिंग्ज

टाकलेले बॉल्स

दिलेले रन्स

बळी

इनिंग्जमधील सर्वोत्तम खेळी

मॅचमधील सर्वोत्तम खेळी

इकॉनॉमी

अॅव्हरेज

बॉलिंग स्ट्राइक रेट

पाच विकेट्स घेण्याची कामगिरी

कसोटी

१७

२९

३४४७

१८६६

४४

७२/

११७/

.२५

४२.४१

७८.३४

एकदिवसीय

१२०

१२०

५७५१

४९८१

१५७

२३/

२३/

.

३१.७३

३६.६३

टी - २०

२६

२६

५६४

७२९

३४

१९/

१९/

.७६

२१.४४

१६.५९

आयपीएल

८८

८८

१९०८

२९४५

१०६

१०/

१०/

.८५

२३.५४

१८.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link