Next
‘विद्यार्थिनींनी स्वतः सक्षम बनावे’
अंकिता कामतीकर यांचे प्रतिपादन
नागेश शिंदे
Friday, January 25, 2019 | 01:15 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर : ‘विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करून समाजामध्ये निर्भीडपणे वावरावे आणि स्वतः सक्षम बनावे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रदेश सहमंत्री अंकिता कामतीकर यांनी केले.

‘अभाविप’ व इंडियन फोर्स अॅकॅडमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात ‘अभाविप’चे शहरमंत्री अजय बेदरकर यांनी मिशन साहसी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन केले. हा कार्यक्रम २४ जानेवारी २०१९ रोजी आयोजित केला होता.या वेळी बोलताना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अमरदीप वायगावकर म्हणाले, ‘अभाविप हे समाजात व शिक्षणात विद्यार्थांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्याचे काम गेल्या ७० वर्षांपासून अविरतपणे करत आहे. सध्याच्या काळात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे लागणार आहे.’यानंतर आदर्श राजे जिल्हा संयोजक श्री. खेडेकर यांनी उपस्थित विद्यार्थिनींना ओढणी, बांगड्या, टाचणी, पेन व आदी वस्तूंपासून स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले. या वेळी इंडियन फोर्स अॅकॅडमीचे प्रा. डी. के. कदम, शहर मंत्री अजय बेदरकर, ‘हुजपा’ महाविद्यालय, ‘अभाविप’चे अध्यक्ष संदेश नरवाडे, उपाध्यक्ष आकाश कुपटे, राजा भगीरथ विद्यालय अध्यक्ष देवानंद चरलेवार, उपाध्यक्ष बालाजी चव्हाण यांसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search