Next
औषधशास्त्रविषयक राज्यस्तरीय स्पर्धेत शिरोळचा झेंडा
‘अनिल मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज’च्या आरती रजपूत आणि श्वेता कदम प्रथम
BOI
Friday, September 07 | 06:19 PM
15 0 0
Share this story

राज्यस्तरीय स्टुडंट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या  आरती रजपूत आणि श्वेता कदम यांना विजय कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी लतीफ मगदूम, इरफान शेख आदी मान्यवर

पुणे : ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या (एमएसबीटी, मुंबई ) २०१८-१९ च्या राज्यस्तरीय स्टुडंट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ‘अनिल मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज’च्या आरती रजपूत आणि श्वेता कदम यांनी बाजी मारली आहे. ‘फार्मा व्हिजन टेक्निकल’विषयावरील या स्पर्धेत  देशभरातून ३३ संघ सहभागी झाले होते. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

या स्पर्धेत ‘लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी’च्या शिवम अंधोळकर आणि ऋषिकेश आरू यांनी व्दितीय क्रमांक मिळवला. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील आण्णासाहेब डांगे कॉलेजच्या काजल कुमठेकर आणि मोनिका गुंजाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.  

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी’ तर्फे आयोजित ही स्पर्धा नुकतीच आझम कॅम्पस येथे झाली. विविध महाविद्यालयातील तज्ज्ञांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये डॉ. अमोल शाह (प्राचार्य, श्री सीताबाई थिटे कॉलेज, शिरूर), डॉ. एस. व्ही. देशपांडे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट, आकुर्डी, पुणे), जी. स्वामी (प्राचार्य, आर.एम पी चे भालचंद्र इन्स्टिट्यूट, पुणे), डॉ आर. आर. वाके (प्राचार्य, लोकसेवा कॉलेज, पुणे), प्रा. एम. बी. जोगरा (एस. शंकरराव कॉलेज), प्रवीण जावळे (भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट, एरंडवणे), अनिरुद्ध दडके, पी. पी. हंबर (जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट) यांचा सहभाग होता. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसबीटी, पुणे केंद्राचे उपसचिव विजय कोल्हे यांच्या हस्ते झाले. या वेळी एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख उपस्थित होते. 

‘विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सबळ करणे या उद्देशाने एमएसबीटीने प्रस्तावित केलेल्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. डिप्लोमा स्तरावरील तांत्रिक शिक्षण हे उद्योगातील तंत्रज्ञानाच्या  नवीनतम गरजांशी सांगड घालणारे असावे असा एमएसबीटीचा दृष्टीकोन आहे’, असे  विजय कोल्हे यांनी सांगितले.   

‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. व्ही. एन जगताप यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी केले. तसलीम कुरेशी यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link