Next
सिल्व्हर बेसिस ग्रुपचा चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 05:49 PM
15 0 0
Share this story

चाकणमधील बेसिस मोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाची माहिती देताना रायन हॉंग,  पिएरे लॉईस बोलॉंन, हान्स क्रुग व जॉर्ज जोसेफ.

पुणे : ‘ऑटोमोटिव्ह इंजेक्शन टूलींगमधील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘सिल्व्हर बेसिस’ कंपनीने चाकणमध्ये आपला नवीन अत्याधुनिक प्रकल्प सुरु केला असून, येत्या २५ मार्चपासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून यासाठी ५० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे’, अशी माहिती ‘सिल्व्हर बेसिस’चे इव्हीपी रायन हॉंग यांनी दिली. या वेळी फॉरेशिया कंपनीच्या टूल्स आणि इक्विपमेंट विभागाचे संचालक पिएरे लॉईस बोलॉंन, शेंझेन सिल्व्हर बेसीस टेक्नोलॉजी कंपनीचे उपाध्यक्ष हान्स क्रुग, बेसिस मोल्ड इंडियाचे महाव्यवस्थापक जॉर्ज जोसेफ उपस्थित होते. 
 
‘ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील आघाडीची कंपनी फॉरेशिया आणि पुण्यातील इंजेक्शन मोल्ड मेकिंग कंपनी क्राफ्ट्समन टूलींग यांच्या सहयोगाने बेसिस मोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सिल्व्हर बेसिसच्या गेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळातील बेसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एक माईलस्टोन आहे.  भारतातील आणि भारताबाहेरील ऑटोमोटिव्ह बाजारपेठेला उत्तमोत्तम टूल्स देण्याची योजना आहे, असे रायन हॉंग यांनी स्पष्ट केले.
 
‘ऑटोमोटिव्ह मार्केटमधील मध्यम आणि मोठ्या आकाराच्या इंजेक्शन टूल्सकरिता ही सेवा उपयुक्त असणार असून स्थानिक आणि निर्यात गरजांसाठी याचा फायदा होईल. चीनबाहेर प्रथमच ते नवी साधनांची निर्मिती भारतात करणार आहेत. सध्या भारतात ८० ते ९० टक्के मोल्ड्स आयात केले जात असून, भारतीय बाजारपेठेत १० ते १२ टक्क्याने वार्षिक वाढ होत आहे. येत्या तीन ते पाच  वर्षात एकशेवीस मोल्ड्सच्या निर्मितीद्वारा  दरवर्षी  उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे, तसेच पुढील तीन वर्षात सत्तर कोटी महसूल मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतातील प्रकल्पातून  ५० टक्के निर्यातीचे उद्दिष्ट आहे. सध्या या प्रकल्पात ८० कर्मचारी असून, येत्या दोन ते पाच वर्षात त्यात मोठ्या संख्येने वाढ करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link