Next
नेमबाज इलॅवेनिलला सुवर्णपदक
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this story

इलॅवेनिल वॅलरिवन
पुणे :  येथील ‘गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमी’ची नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने सिडनी येथे झालेल्या ‘आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप’मध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. इलॅवेनिलने या स्पर्धेत २४९.९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला; तसेच पात्रता फेरीतही तिने ६३१.४ गुण मिळवत ज्युनिअर गटात जागतिक विक्रम नोंदवला. 

इलॅवेनिल ही मूळची गुजरातची असून ती पुण्यात ‘गन फॉर ग्लोरी’च्या ‘प्रोजेक्ट लीप’ या उपक्रमाअंतर्गत नेमबाजीचे प्रशिक्षण घेते. तिने आपल्या संघातील नेमबाज श्रेया अगरवाल आणि झीना खिट्टा यांच्यासमवेत एकूण १८७६.९ गुणांची घसघशीत कमाई करत सांघिक सुवर्णपदकही पटकावले आणि नेमबाजीच्या ज्युनिअर विभागात आणखी एक जागतिक विक्रम नोंदवला. श्रेया अगरवाल हीदेखील ‘गन फॉर ग्लोरी’च्या जबलपूर शाखेत प्रशिक्षण घेते.

गगन नारंग
‘गेल्या काही महिन्यांपासून नेमबाजीचा केलेला सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश अपेक्षित होते, अशी भावना इलॅवेनिल हिने व्यक्त केली. ती म्हणाली,‘या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि ‘गन फॉर ग्लोरी’मधील माझ्या प्रशिक्षकांना जाते. ‘गगन नारंग स्पोर्ट्स फाऊंडेशन’चे सहसंस्थापक गगन नारंग यांचे मी विशेष आभार मानते.’    
    
‘इलॅवेनिलमध्ये जागतिक स्तरावरील विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता आधीपासूनच होती. या स्पर्धेतील यशामुळे ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यापुढेही ती हा लौकिक कायम ठेवेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.’ असे गगन नारंग यांनी सांगितले.

संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंग म्हणाले, ‘आम्ही सुरू केलेला ‘प्रोजेक्ट लीप’ हा प्रशिक्षण उपक्रम योग्य दिशेने सुरू आहे याचे हे द्योतक म्हणायला हवे. भविष्यात नेमबाजीत अधिकाधिक उत्तम कामगिरी होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चत फलदायी ठरेल. ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट आणि डॉ. लाल पॅथलॅब यांचे या प्रशिक्षण उपक्रमास सहकार्य लाभले अहे. हा एक ‘स्कॉलरशिप बेस्ड’ उपक्रम असून त्यात सहभागी होण्यासाठी नेमबाजांना कठीण चाचण्या पार कराव्या लागतात. त्याअंतर्गत गुणवान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते. इलॅवेनिलने ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये प्रदर्शन करण्यापूर्वी ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स- २०१८’मध्ये ४०० गुणांची कमाई करत वैयक्तिक कांस्य पदक आणि सांघिक रौप्य पदक पटकावले होते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link