Next
पेमेंट कार्ड सुरक्षेसाठी ‘ई शिल्ड’ तंत्रज्ञान
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्राहकांना अतिशय सोयीस्करपणे त्यांची डेबिट व क्रेडिट कार्डे ‘ऑन’ व ‘ऑफ’ करता येतील. डिजिटल व्यवहारांच्या वाढीच्या बाबतीतील सुरक्षिततेबाबतची  चिंता दूर करण्यासाठी, भारतात पहिल्यांदाच अॅटम टेक्नालॉजिज व ट्रॅनवॉल यांनी ‘ई-शिल्ड’ नावाचे नवे तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांमधील  जोखीम हाताळण्यासाठी व व्यवहारावर रिअल-टाइम नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. 

सरकारकडील आकडेवारीनुसार, भारतात २१ डिसेंबर २०१७ पर्यंत, क्रेडिट व डेबिट कार्डे आणि इंटरनेट बँकिंगचा समावेश असलेल्या एकूण १७९ कोटी रुपयांचा समावेश असलेल्या २५ हजार ८०० घोटाळ्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यामुळे सुरक्षेच्या भीतीने भारतातील असंख्य ग्राहक त्यांची कितीही इच्छा असली तरी डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास घाबरत आहेत. त्यावर हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. 

स्मार्टफोन अॅपचा वापर करून किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एनेबल्ड बॉट सेवांचा वापर करून व्हॉइस व चॅट यासाठी ही सेवा सुरू करून, ग्राहकांना इंटरनेट (ई-कॉमर्स), एटीएम, पीओएस टर्मिनल किंवा परकीय व्यवहार याद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट कार्डांचे व्यवहार स्विच ‘ऑन’ व ‘ऑफ’ करता येऊ शकतात. कोणत्या व्यवहारांना परवानगी द्यायची व कोणत्या नाही, त्यानुसार ग्राहकांना रिअल-टाइममध्ये त्यांची कार्डे/नेटबँकिंग सेट करता येऊ शकते व त्यामुळे त्यांच्या पैशांचा वापर करू शकतील अशांवर त्यांना पूर्णतः नियंत्रण मिळवता येऊ शकते.
 
ग्राहकांना रिअल-टाइम पद्धतीने कार्डे व खाती यांची सद्यस्थिती तपासता येते, बॅलन्स तपासता येतो व अन्यही फायदे मिळवता येतात. स्मार्ट फोन युजर त्यांच्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अॅपद्वारे प्रगत स्तरातील नियंत्रण मिळवू शकतात, तर नॉन-स्मार्ट फोन युजर एसएमएस व यूएसएसडी याद्वारे त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवू शकतात, जेणे करून सर्व ग्राहकांना संरक्षण देणे शक्य होते.
      
या वेळी बोलताना, अॅटम टेक्नालॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग नरेला म्हणाले, ‘आम्हाला ट्रॅनवॉलच्या मदतीने हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान भारतात दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. घोटाळे रोखणारे हे नवे साधन एकीकडे ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करते, तर दुसरीकडे ते बँकांना सुरक्षेसाठी व त्यांच्या जबाबदारीच्या रक्षणासाठी करावा लागणारा खर्च कमी करण्यासाठी मदत करते – त्यामुळे ग्राहक व बँका या दोन्हींच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरते. विविध प्रदेशांतील अनेक बँकांमध्ये हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवणारी ट्रॅनवॉल ही प्रवर्तक कंपनी आहे आणि आता तिने अॅटमच्या मदतीने भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय बाजाराविषयी अॅटमला असलेल्या सखोल आकलनामुळे हे उत्पादन भारतात लवकरच लोकप्रिय होईल, असा विश्वास आहे.’ 

अॅटम टेक्नालॉजिज ही देशातील एक आघाडीची डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी बँका, रिटेलर, शैक्षणिक संस्था, ई-कॉमर्स कंपन्या अशा विविध प्रकारच्या ग्राहकांबरोबर काम करते. या नव्या व्हाइट लेबल उत्पादनाद्वारे येत्या दोन तिमाहींमध्ये देशातील आघाडीच्या सर्व बँकांशी सहयोग करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
 
ट्रॅनवॉलचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग हेन्स म्हणाले, ‘डिजिटल व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतातील सरकारने हाती घेतलेले ‘फेसलेस, पेपरलेस व कॅशलेस’ अभियान आम्ही जाणतो. देशात ९० कोटी पेमेंट कार्डांच्या वापराला चालना देण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बाबींचे नियंत्रण उपलब्ध करून आणि त्यांच्या पेमेंट कार्डांवरून किंवा खात्यांवरून कोणत्या व्यवहारांना परवानगी द्यायची व कोणत्या व्यवहारांना द्यायची नाही, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देऊन  आमच्या उत्पादनांनी अधिक सुरक्षितता देऊ केली आहे आणि ग्राहकांना नॉन-कॅश पेमेंट्सच्या बाबतीतील गरजेचा असलेला आत्मविश्वास निर्माण केला आहे आणि यामुळे पेमेंट करण्यासाठी कार्डांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल वैशिष्ट्ये सुरक्षितता व सोय देत असल्याने, मोबाइल बँकिंगच्या वैशिष्ट्यांच्या मदतीने ग्राहकांकडून मागणी वाढते आहे आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब व वापर यांना चालना देण्याच्या भारत सरकारच्या प्राधान्याला सहकार्य करण्यासाठी आमची व्यवहारावर नियंत्रण देणारी सेवा अतिशय उपयुक्त आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link