Next
‘ड्रूम’वर जुन्या टॅक्सी खरेदी-विक्रीची सुविधा
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 04:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ड्रूम’ या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ऑटोमोबाइल बाजारपेठेने नव्याने सुरू केलेल्या ‘टॅक्सीज’ या विभागाअंतर्गत जुनी टॅक्सी खरेदी आणि विक्री करण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांना सक्षम बनविले आहे. या जुन्या टॅक्सी एक लाख रुपये किंवा त्याहून अधिकच्या किंमतीमध्ये उपलब्ध असतील. विक्रेते आणि खरेदीदार ओबीव्हीच्या साहायाने मंचावर उपलब्ध होणाऱ्या टॅक्सींचे योग्य मूल्य जाणून घेऊ शकतील; तसेच वाहन स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी ‘ड्रूम’चा इको प्रमाणित तपासणी अहवालसुद्धा ऑर्डर करू शकतील.         

‘ड्रूम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल म्हणाले, ‘ड्रूम भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन ऑटोमोबाईल मंच असून, आमचा प्रयत्न मंचावर ऑटोमोबाइल क्षेत्राशी निगडीत सर्व श्रेणी उपलब्ध करून देण्याचा आहे, जेणेकरून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होतील. आम्हाला वापरलेल्या टॅक्सींची खरेदी करण्यासंदर्भात ग्राहकांकडून विचारणा झाली म्हणून आम्ही आमच्या वाहनांच्या यादीत अशा वाहनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. ‘टॅक्सीज’ विभागाच्या माध्यमातून आम्हाला नवीन ग्राहक आणि बाजारपेठापर्यंत आमची पोहोच वाढविणे शक्य झाले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link