Next
ग्रंथालय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
BOI
Tuesday, August 28, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोसोलापूर : सन २०१८-१९च्या ग्रंथालय पुरस्कारासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवकांनी आपले अर्ज २८ सप्टेंबर २०१८पर्यंत तीन प्रतींत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रधान ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे. 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दिला जातो. ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. 

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये ५० हजार, रुपये ३० हजार, रुपये २० हजार, रुपये १० हजार रोख, शाल, श्रीफळ, आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते . 

राज्यस्तरीय पुरस्कारात प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. 

(ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांच्याबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख https://goo.gl/jG2iif या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Suresh Salunke About 172 Days ago
Thanks For Information
0
0

Select Language
Share Link