Next
५ एएम क्लब
BOI
Thursday, June 20, 2019 | 10:44 AM
15 0 0
Share this article:

आयुष्यात काही वेळा कंटाळा येतो, नैराश्य येते, एकाकी वाटू लागते. पूर्वीसारखी परिस्थिती राहत नाही आणि नव्या व्यवस्थेत जुळवून घेता येत नाही, अशी अवस्था होते. पण अपयशातूनही खूप काही शिकण्यासारखे असते. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपणा, सततचे प्रयत्न तसेच आत्मशोधामुळे व्यक्ती वेगाने प्रगती करत असते, असा विश्वास देत रॉबिन शर्मा यांनी ‘५ एएम क्लब’मधून पहाटेची जीवनरीत आणि शैली यांचे महत्त्व सांगितले आहे. 

एक चित्रकार व एक महिला उद्योजिका यांना काळजीमुक्त, तणावमुक्त करीत खुले जीवन जगण्याचा सल्ला प्रथितयश उद्योजक मि. रिले देतात. तसेच ‘५ एएम क्लब’चे महत्त्व एका व्याख्यात्याच्या ओघवत्या भाषणाच्या आधाराने यात पटवून दिले आहे. पहाटेच्या जीवनशैलीमुळे होणारा विकास, प्रगती यांची दिशा दाखवली आहे. पहाटेच्या निरव शांततेत शिकण्याच्या अवस्था असते. पहाटे आपले मन गतिमान असते. पहाटे उठण्याची कला आत्मसात केली की जीवन समृद्ध होते, हा संदेश देताना अनेक उदाहरणेही दिली आहेत.  

पुस्तक : ५ एएम क्लब
लेखक : रॉबिन शर्मा
प्रकाशक : जयको बुक्स 
पाने : ३१४ 
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search