Next
मसूरची संज्योत
BOI
Monday, November 12, 2018 | 04:07 PM
15 0 0
Share this story

‘सामन्यात’ ‘असामान्यत्व’ आढळणारे व्यक्तिमत्त्व असलेले र. वि. उर्फ राघूअण्णा लिमये म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांची कन्या आशा लिमये यांनी ‘मसूरची संज्योत’मधून अण्णांचे जीवनचित्रण केले आहे. लिमये यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा होता. म्हणूनच लेखिकेने आजीबद्दल आधी सांगत वडिलांच्या बालपणीच्या व विद्यार्थीदशेतील आठवणी सांगितल्या आहेत.

स्पष्टवक्तेपणा, सत्याची कास धरणे, तल्लख बुद्धी, अभ्यासू वृत्ती, पहाडी आवाज ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. देशात धार्मिक, राजकीय, शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याची त्यांना तळमळ होती. सुधारणेबरोबरच जनतेत देशप्रेम निर्माण करणे, पुढारी निर्माण करणे या विचाराने त्यांनी राष्ट्रकार्यास वाहून घेतले. मसूर या मूळ गावी अण्णांचे काम जास्त झाले. स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग राष्ट्रसेवा दलातील कार्य या संबंधाची माहिती देताना आई-वडिलांचे नाते, कौटुंबिक अण्णा, रसिक कलावंत, जवळचे मित्र यातून राघुअण्णा लिमयांचे चरित्र समोर ठेवले आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाच अंगीकार त्यांनी जीवनात कसा केला, हेही लेखिकेने सांगितले आहे.  
      
प्रकाशन : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : ११२
मूल्य : ९५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link