Next
शरद पवार यांच्या १३ जूनपासून जिल्हानिहाय बैठका
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १३ जून २०१९पासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी स्थापना दिवस साजरा करण्यात आला असून, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. १३ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ मुंबई, १२ ते १२.३० वसई, विरार, पालघर, १२.३० ते एक रत्नागिरी, दोन ते २.३० पनवेल शहर, रायगड, २.३० ते तीन सिंधुदुर्ग, तीन ते चार ठाणे शहर, चार ते ४.३० कल्याण, डोंबिवली, मिराभाईंदर, ४.३० ते पाच ठाणे ग्रामीण, पाच ते ५.३० उल्हासनगर, भिवंडी, ५.३० ते पुढे नवी मुंबई. 

१४ जून रोजी सकाळी १० ते ११ नाशिक शहर, ११ ते १२ नाशिक ग्रामीण, मालेगाव, १२ ते एक धुळे शहर, ग्रामीण, दोन ते २.३० नंदुरबार, २.३० ते ३.३० जळगाव शहर, ग्रामीण, ३.३० ते पुढे अहमदनगर शहर, ग्रामीण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

या बैठकांना ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे हे यांसह त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search